SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘व्हॉटस अ‍ॅप’वरील मेसेज 24 तासांत डिलिट होणार, असे सुरु करा नवे फीचर..!

‘व्हॉटस अ‍ॅप’… सोशल मीडियातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अ‍ॅप..! युजर्सला येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कंपनीने सातत्याने ‘व्हॉटस अ‍ॅप'(whats app)मध्ये नवनवी फीचर्स आणली. त्याचा युजर्सना मोठ्या प्रमाणात फायदाही होताना दिसत आहे..

काही दिवसांपूर्वीच ‘व्हॉटस अ‍ॅप’ने ‘डिसअपिरिंग मेसेज’ (Disappearing Message) हे फिचर आणलं होतं. त्यात ७ दिवसांनंतर मेसेज आपोआप डिलिट होण्याचा पर्याय होता. अगदी ‘व्हॉटस अ‍ॅप’ ग्रुपमध्येही युजर्सना हे फीचर वापरता येत होते. आता कंपनीने त्यात आणखी सुधारणा केल्या आहेत..

Advertisement

‘व्हॉटस अ‍ॅप’ने ‘डिसअपिरिंग मेसेज’मध्ये आणखी दोन पर्याय युजर्ससाठी उपलब्ध करुन दिले आहेत. आता या फिचरमध्ये 24 तास ते 90 दिवसांपर्यंतचे ‘ऑप्शन’ मिळणार आहेत. त्यामुळे या मोडचा वापर करून पाठवलेले मेसेजेस 24 तासांनी आपोआप डिलीट होणार आहेत. हा पर्याय सर्व चॅटमध्ये ‘डिफाॅल्ट’ दिला जाणार असल्याची घोषणा ‘व्हॉटस अ‍ॅप’ने सोमवारी (ता. 6) केली.

कंपनीने सांगितले, की “नवं फीचर हे ऐच्छिक असून, त्यामुळे सध्याचे चॅट डिलिट होणार नाहीत. गेल्या वर्षीच व्हॉटस अ‍ॅपने ‘डिसअपिरिंग मेसेज’ हे फीचर आणलं होतं. शिवाय आणखी एक फीचर दिले होते. त्यात फोटो वा व्हिडिओ पाठवल्यानंतर समोरच्या व्यक्तीने पाहिल्यानंतर ते आपोआप डिलिट करता येत होते.”

Advertisement

‘डिफाॅल्ट डिसअपिरिंग मेसेज’ पर्याय निवडल्यानंतर ज्यांच्यासोबत चॅट करीत आहात, त्यांना तुम्ही डिफाॅल्ट पर्याय निवडल्याचं नोटिफिकेशन चॅटमध्ये दिसेल. एखादे चॅट डिलिट होऊ नये, असे वाटल्यास आधीचे पुन्हा सेटिंग करता येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केलेय.

फीचर कसे सुरु करणार..?
– व्हाॅट्स अ‍ॅपमध्ये हवा असलेला कॉन्टॅक्ट निवडा
– कॉन्टॅक्टच्या प्रोफाईलवर जा.
– खाली स्क्रोल केल्यावर डिसअपिरिंग मेसेज पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
– फीचर ऑन करुन 24 तास, 7 दिवस, 90 दिवसांपैकी एका पर्यायाची निवड करा.
– वरिल स्टेप्स फाॅलाे करून हे फिचर बंदही करता येईल.

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement