SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पॅनकार्ड हरवण्याची भीती वाटते, मग मोबाईलमध्ये ठेवा ई-पॅन कार्ड.. असे करा डाऊनलोड..!

पॅन कार्ड म्हणजे, एक महत्वाचा दस्ताऐवज.. कोणतेही सरकारी काम असो, ते पॅन कार्डशिवाय पूर्णच होत नाही.. मग ते आयकर रिटर्न भरणे असो, वा बँकेत खाते सुरु करायचे.. अगदी कार खरेदी करायची झाली, तरी पॅन कार्डची कॉपी मागितली जाते.

कोणत्या कामासाठी कधी पॅन कार्ड लागेल, ते सांगता येत नाही. त्यामुळे अनेकांच्या पाॅकेटमध्येच ते विसावलेले असते.. मात्र, बऱ्याचदा पाॅकेट चोरी होते किंवा पॅन कार्डही गहाळ होते.. मग दुसरे पॅन कार्ड मिळेपर्यंत अनेक कामे अडकून पडतात. शिवाय आपल्या पॅन कार्डचा दुरुपयोग होण्याचीही शक्यता असते.

Advertisement

पॅन कार्ड हरवण्याची भीती असल्याने मोबाईलवर पॅन कार्डची ई-कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी डाउनलोड करणे फायद्याचे ठरु शकतं. ई-पॅन कार्ड (e-PAN Card) डाउनलोड केल्यावर ते मोबाइलमध्ये, मेलवर किंवा क्लाउड स्टोअरेजवरही सेव्ह करता येतं. त्यामुळे फिजिकल कॉपी बाळगण्याची गरज पडत नाही.

पॅन कार्ड हरवलं असेल, तरी ई-पॅन कार्ड ऑनलाइन पद्धतीने काढू शकता. ही प्रक्रिया अगदी 10 मिनिटांतच पूर्ण होते. अर्थात केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आधार कार्डची गरज लागते. चला तर मग या प्रोसेसबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

ऑनलाईन पॅन कार्ड कसे काढायचे..?
– सर्वप्रथम http://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html या वेबसाइटवर जा.. तेथे ‘डाउनलोड ई-पॅन’ या पर्यायावर क्लिक करा.

– नंतर तुमचा पॅन कार्ड नंबर व नंतर आधार क्रमांक द्यावा लागेल.
– त्यानंतर जन्मतारीख टाकावी लागेल. पुढे नियम आणि अटी स्वीकाराव्या लागतील.

Advertisement

– नंतर तुमच्या मोबाइलवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून पुढील प्रोसेस करा.
– आता पेमेंट करण्यासाठीचा पर्याय ‘पॉप-अप’ होईल. 8.26 रुपये पेमेंट करावं लागेल. हे पेमेंट UPI, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डनेही करता येतं.

– पेमेंट पूर्ण झाल्यानंतर ई पॅनकार्ड डाउनलोड करू शकता.
– पॅन कार्डची ही पीडीएफ फाइल पासवर्डने सुरक्षित असेल. हा पासवर्ड तुमची जन्मतारीख असेल.

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement