भारताने नुकताच न्यूझीलंडचा 1-0 अशी कसोटी मालिका जिंकत पराभव केला. भारतीय गोलंदाजी यावेळी अधिक सरस ठरली. आता काही दिवसानंतर होणाऱ्या भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे (india vs south africa timetable) सुधारित वेळापत्रक सोमवारी आयसीसीने जाहीर केले आहे.
भारताच्या दक्षिण आफ्रिका सोबतच्या दौऱ्यातील 4 ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका रद्द करण्यात आली. आधीच्या वेळापत्रकात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे आता बदल करत भारतीय संघ या दौऱ्यावर आता 3 कसोटी व 3 वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. 26 डिसेंबरपासून या रोमांचक दौऱ्याला सुरुवात होणार आहे.
श्रीलंका व पाकिस्तान यांच्या खात्यात प्रत्येकी 24 गुण असले तरी त्यांची विजयाची टक्केवारी भारतापेक्षा वरचढ आहे. आता आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघ (India’s tour of South Africa) मालिका विजय मिळवून जागतिक कसोटीत अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2021-23 स्पर्धेतील तीनही कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. तसेच, यामध्ये भारतीय संघाने तिसऱ्या क्रमांकावर राहून न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर WTCमध्ये एकूण 42 गुण कमावले आहेत.
भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यांचे वेळापत्रक:
कसोटी सामने:
▪️ पहिली कसोटी – 26 ते 30 डिसेंबर, दुपारी 1.30 वाजल्यापासून, सेंच्युरियन
▪️ दुसरी कसोटी – 3 ते 7 जानेवारी, 2022, दुपारी 1.30 वाजल्यापासून, जोहान्सबर्ग
▪️ तिसरी कसोटी – 11 ते 15 जानेवारी, 2022, दुपारी 2 वाजल्यापासून, केप टाऊन
एकदिवसीय सामने:
▪️ पहिली वन डे – 19 जानेवारी 2022, दुपारी 2 वाजल्यापासून, पार्ल
▪️ दुसरी वन डे – 21 जानेवारी 2022, दुपारी 2 वाजल्यापासून, पार्ल
▪️ तिसरी वन डे – 23 जानेवारी 2022, दुपारी 2 वाजल्यापासून, केप टाऊन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018