SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘पबजी’ खेळणाऱ्यांसाठी मोठी बातमी, हे महत्वाचे फिचर कायमचे बंद होणार..!

केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणांवरुन सप्टेंबर 2020 मध्ये अनेक चिनी अ‍ॅपवर बंदी घातली होती. त्यात तरुणाईला वेड लावणाऱ्या ‘पबजी’ (PUBG) या गेमिंग अ‍ॅपचाही समावेश होता.. ‘पबजी’वर अचानक बंदी घातल्यानंतर लाखो भारतीय युजर्संना धक्का बसला होता..

दरम्यान, ही संधी साधून या वर्षीच्या सुरुवातीला भारतात ‘पबजी’च्या स्वरुपात ‘बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया’ (Battlegrounds Mobile India) हा गेम लाँच करण्यात आला. त्यालाही तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला..

Advertisement

दरम्यान, ‘पबजी’वर अचानक बंदी घातल्याने जुन्या गेममधील आपल्या डेटाचं काय होणार, याची चिंता युजर्सना लागली होती. ही बाब लक्षात घेऊन ‘बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया’ने हा जुना डेटा नवीन गेममध्ये ट्रान्सफर (Data Transfer) करण्याचाही पर्याय दिला होता.

कधीपासून बंद होणार..?
युजर्सचे रँकिंग, रिवॉर्ड्स, आउटफिट्स, गन्स यांसारख्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश होता. मात्र, आता हे फीचर बंद करण्यात येत असल्याचे गेम डेव्हलपर कंपनी ‘क्राफ्टऑन’ने (Krafton) जाहीर केलं आहे.. त्यानुसार येत्या 31 डिसेंबरनंतर हा डेटा ट्रान्सफर करण्याचे फीचर बंद केले जाणार आहे.

Advertisement

आपल्या अधिकृत वेबसाइटवर ‘क्राफ्टऑन’ कंपनीने ही माहिती दिली आहे. ज्या युजर्संनी पबजी (पूर्वीचे अ‍ॅप) वापरले होते, त्यांच्यासाठी गेम सुरळीत करण्यासाठी ‘बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया’ काही डेटा ट्रान्सफर करणार असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.

भारतीय वेळेनुसार 1 जानेवारी 2022 पर्यंत संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत युजर्सना डेटा ट्रान्सफर करता येणार आहे. मात्र, त्यानंतर हे ‘डेटा इंपोर्ट’ फीचर कायमस्वरूपी बंद होणार आहे.. डेटा ट्रान्सफर करण्यासाठी युजरचे ट्विटर अकाउंट गेमसोबत लिंक असणं आवश्यक आहे.

Advertisement

‘डेटा ट्रान्सफर’ फीचर वादग्रस्त
‘डेटा ट्रान्सफर’ फीचर अनेकदा वादग्रस्त ठरलंय. या गेमद्वारे चीनमधील (China) सर्व्हरवर डेटा परत पाठवला जात असल्याचे आढळले होते. ‘बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडिया’ युनिक गेम फीचर्स देण्यासाठी ‘थर्ड पार्टी सोल्युशन्सचा’ वापर करीत असल्याचे कंपनीने मान्य केले होते.

आता कंपनीने हे फीचरचं बंद करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, अनपेक्षित आणि प्रतिबंधित आयपी अॅड्रेसवर ट्रान्सफर होणाऱ्या सर्व प्रकारच्या डेटाचं मॉनिटरींग आणि प्रोटेक्शन सुरु ठेवणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे..

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement