SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दररोज फक्त 2 रुपये बचत कराल, तर सरकार देणार 3000 रुपये पेन्शन, योजनेविषयी सविस्तर जाणून घ्या..

भारत सरकारने, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेंतर्गत ( Pradhan Mantri Shram Yogi Maan-dhan (PM-SYM) Scheme) पेन्शनची सुविधा सुरू केली आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना धीर देणारी ही योजना केंद्राने 2 वर्षांपूर्वी आणली होती आणि आजमितीला त्या योजनेची लोकप्रियता चांगली वाढू लागली आहे.

पीएम-एसवायएम योजनेत असंघटित क्षेत्रातील 45,11,596 कामगारांची नोंदणी झाली आहे. या योजनेत असंघटित क्षेत्रातील लोक किंवा असे लोक ज्यांचे उत्पन्न 15 हजार रूपयांपेक्षा कमी आहे आणि वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे आहे, असे व्यक्ती खाते उघडू शकतात.

Advertisement

योजनेविषयी विस्तृत जाणून घ्या…

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना म्हणजेच पीएम-एसवायएम योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांना 60 वर्षे वयानंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन देण्याची योजना आहे. चालक, रिक्षाचालक, मोची, शिंपी, मजूर, घरकाम करणारे, वीटभट्टी कामगार इ. व अशा असंघटित क्षेत्रातील कामगार पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Advertisement

जर तुम्ही या योजनेत 18 व्या वर्षी सहभागी झालात तर तुम्हाला 60व्या वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला 55 रुपये योगदान, 29 वर्ष वय असणार्‍यांना 100 रुपये आणि 40 वर्ष वय असणार्‍यांना 200 रुपये योगदान द्यावे लागेल.

तुमच्या वयानुसार तुमचं योगदान किती असेल आणि त्यात सरकार किती योगदान देणार, याविषयी सविस्तर माहीती घेण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा. 👉 https://labour.gov.in/pm-sym

Advertisement

या योजनेत वेगवेगळ्या वयाच्या हिशेबाने 55 रुपये ते 200 रुपये महिन्याला योगदान करावं लागणार आहे. तुम्ही दररोज 2 रुपये बचत करून प्रत्येक महिन्याला योगदान दिल्यास वयाच्या 60व्या वर्षानंतर तुम्हाला दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळण्यास सुरुवात होते.

तुम्हाला या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही EPF, NPS, ESIC या योजनेचा लाभ घेत नसाल किंवा करदाते नसाल तरच सहभागी होता येणार आहे. यासाठी फक्त आधार कार्ड, तुमचे बचत बँक खाते किंवा जनधन बँक खाते आणि संबंधित बँक खात्याचा IFSC कोड सोबत ठेवावा. तुमच्या भागातील CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) मध्ये जाऊन ही सर्व प्रोसेस तुम्ही करून घेऊ शकता
➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement