SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मतदान केलं नाही, तर 350 रुपये बँक खात्यातून कापले जाणार? काय आहे सत्य, वाचा..

सध्या निवडणूक आयोगाच्या (Election Commission) नावाने खोटी माहिती पसरवली जात आहेत. मतदानाची सुटी असली की अनेक जण चक्क फिरायला जातात. लोकशाहीतलं पहिलं कर्तव्य न बजावणाऱ्या बेजबाबदार नागरिकांच्या अकाऊंटमधून पैसे कापले जाणार असल्याचा एक मेसेज सध्या व्हायरल होत आहे.

‘त्या’ व्हायरल मेसेजमध्ये आहे काय?

Advertisement

व्हायरल मेसेजनुसार, व्हॉट्सॲपवर व्हायरल होणाऱ्या या मेसेजमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही मतदान न केल्यास नागरिकांच्या बँक खात्यातून 350 रुपये कापले जातील. मतदानाचा अधिकार न वापरणाऱ्या नागरिकांसाठी आयोगाने हा आदेश काढला असल्याची त्यात माहीती आहे, असं म्हटलं आहे.

आधार कार्डद्वारे अशा नागरिकांची ओळख पटली की, तुमच्या आधारला (Aadhaar card) जोडलेल्या खात्यातून पैसे कापले जातील. आयोगानं यासाठी कोर्टाची आधीच परवानगी घेतल्याचा दावाही या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. मतदान न करणाऱ्या या लोकांमुळे त्यांच्यासाठी केलेला खर्च वाया जातो. तो वसूल करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं या मेसेजमध्ये उल्लेख केला आहे.

Advertisement

पीआयबीच्या ट्विटर हँडलवर याचं स्पष्टीकरण दिलं आहे. पीआयबीने सांगितलं की, लोकसभा निवडणुकीत मतदान न करणाऱ्या नागरिकांच्या बँक खात्यातून 350 रुपये कापले जाणार असल्याचा दावा साफ खोटा आहे. तरी देशातील निवडणूक आयोगाने असा असा काहीच निर्णय घेतला नाहीये तरी याप्रकरणी अफवा शेअर न करण्याचं, आवाहन या ट्विटमध्ये केलं आहे.

निवडणूक आयोगानंही या मेसेजमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं अगदी स्पष्ट सांगितलं. म्हणून ‘जर तुम्ही मतदान केलं नाही तर 350 रुपये कापले जातील’, या व्हायरल मेसेजमागचे (Viral Message on whatsapp) सत्य आता समोर आलं आहे. मात्र हेही आपण लक्षात ठेवायला हवं की, तुमचे पैसे कापले जाणार नसतील तरी आपण मतदान करणं गरजेचे आहे आणि आपला लोकशाहीतील आपला तो अधिकार आहे, हे मात्र विसरू नका.
➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement