SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पीएफ खातेधारकांना होणार 7 लाख रुपयांपर्यंत फायदा, कुटुंबालाही होणार मदत, वाचा..

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत अर्थात ईपीएफओ EPFO आपल्या सर्व सदस्यांना त्यांच्या खात्यासोबत कर्मचारी ठेव लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI) अंतर्गत कर्मचाऱ्यांना इन्श्युरन्सची मोफत सुविधा देते. पीएफ खात्यासोबतच हा इन्श्युरन्स लिंक केला जातो. यासाठी कर्मचार्‍याला कोणतेही अंशदान द्यावे लागत नाही.

कोणता लाभ मिळणार?

Advertisement

प्रत्येक सरकारी कर्मचार्‍याला EPF अकाऊंटसोबत 7 लाख रुपयांपर्यंत लाईफ इन्श्युरन्स कव्हर (life insurance cover) एकदम मोफत मिळते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) च्या एखाद्या सदस्याचा अचानक मृत्यू झाला तर त्याचे नॉमिनी लाईफ इन्श्युरन्सच्या (Life Insurance) रक्कमेवर क्लेम करू शकतात.

EPFO सदस्यांना आयुर्विमा कव्हर एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम (EDLI Insurance cover) अंतर्गत मिळते. या स्कीम अंतर्गत ईपीएफओच्या एखाद्या सदस्यांचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला कमाल 7 लाख रुपये (epfo members get 7 lakh rupees free benefits) दिले जाऊ शकतात. याचा फायदा खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मोफत मिळणार असल्याची माहीती आहे.

Advertisement

या योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभाची मर्यादा यापूर्वी 3.60 लाख रुपये होती. अलीकडेच ती मर्यादा 6 लाख रुपये करण्यात आली. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये ही मर्यादा पुन्हा वाढवून 7 लाख रुपये करण्यात आली. बोनसची मर्यादा सुद्धा दिडलाखावरून वाढवून अडीच लाख रुपये करण्यात आले होते.

क्लेम करताना काय असतील अटी?

Advertisement

या रक्कमेसाठी क्लेम नॉमिनीकडून पीएफ खातेधारकाचा आजाराने, दुर्घटनेत किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर केला जाऊ शकतो. यामध्ये एकरक्कमी पैसे दिले जातात. हा इन्श्युरन्स कव्हर सबस्क्रायबरला फ्री मिळतो. यासाठी त्यांना कोणतीही रक्कम द्यावी लागत नाहीत. PF Account सोबत ते लिंक होते. यासाठी इन्श्युरन्स कंपनीला डेथ सर्टिफिकेट, सक्सेशन सर्टिफिकेट आणि बँक डिटेल्स देण्याची आवश्यकता असते.

EPF अकाऊंटवर होणार्‍या या इन्श्युरन्सचा दावा केवळ आजार, अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कर्मचारी किंवा नामनिर्देशित व्यक्तीच्या वतीने (how to claim EDLI scheme) योजनेवर तेव्हाच केला जाऊ शकतो. जेव्हा पीएफ खातेधारकाचा मृत्यू नोकरीच्या दरम्यान झाला असेल. या दरम्यान तो कार्यालयात काम करत असो किंवा सुट्टीवर असो, यामुळे काही फरक पडत नाही. यावेळीही नॉमिनी पैशांसाठी क्लेम करू शकतात.

Advertisement

क्लेम करण्यासाठीचा अर्ज पाहण्यासाठी क्लिक करा 👉 https://www.epfindia.gov.in/site_docs/PDFs/Downloads_PDFs/Form5IF.pdf

पीएफ खातेधारकाचा मृत्यूनंतर मृत कर्मचाऱ्याची पत्नी, अविवाहित मुली आणि अल्पवयीन मुले हे लाभार्थी असतील. जर दावेदार अल्पवयीन (18 वर्षांपेक्षा कमी) असेल, तर त्याचे पालक त्यांच्यावतीने दावा करू शकतात. तसेच, निवृत्तीनंतर विमा रक्कमेसाठी क्लेम केला जाऊ शकत नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081

Advertisement