SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘हार्ले डेव्हिडसन’ची ‘स्पोर्टस्टर-एस’ भारतात लाॅंच, फिचर्स पाहून तोंडात बोटे घालाल..!

अमेरिकन ऑटो कंपनी ‘हार्ले डेव्हिडसन’चं (Harley-Davidson) नुसतं नाव घेतलं, तरी एकापेक्षा एक मजबूत नि दणकट बाईक्स नजरेसमोर येतात.

जगातील प्रत्येकालाच ‘हार्ले डेव्हिडसन’च्या बाईक्सने वेड लावलंय.. मात्र, त्यांच्या बाईक्सबाबत सर्वसामान्य माणूस फक्त विचारच करु शकतो, कारण त्या सर्वसामान्यांच्या खिशाला झेपणाऱ्या नसतात…

Advertisement

‘हार्ले डेव्हिडसन’ कंपनीने नुकतीच भारतात त्यांची एक दमदार बाईक्स लाॅंच केलीय.. तिचं नाव आहे.. ‘स्पोर्टस्टर-एस’.. भारतीय रस्त्यावर लवकरच ही बाईक धावताना दिसू शकेल. मात्र, त्याआधीच तिची मोठी चर्चा सुरु झाली आहे..

‘हिरो मोटोकॉर्प’सोबत ‘हार्ले डेव्हिडसन’ची भागीदारी असून, त्याअंतर्गत भारतात ही दुसरी बाईक लाॅंच करण्यात आली आहे.. चला तर मग या बाईक्सच्या वैशिष्ट्यांबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

‘स्पोर्टस्टर-एस’ची वैशिष्ट्ये
– ‘हार्ले-डेविडसन’ म्हटलं की पावरफूल इंजिन असणार, हे नक्की.. तसेच या ‘स्पोर्टस्टर-एस’मध्ये तब्बल १२५२ सीसीचे V-Twin इंजिन देण्यात आले आहे.
– ‘स्पोर्टस्टर एस’च्या पॉवर परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाल्यास या बाईकचे इंजिन ६००० आरपीएमवर १२१ बीएचपीची कमाल पॉवर आणि १२७ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.

– आकारमानाबद्दल बोलायचे झाल्यास बाईकची लांबी २२७० एमएम, ट्रेल १४९ एमएम आहे. ग्राउंड क्लीयरन्स ९० एमएम आहे. त्याचा व्हील बेस १५२० मिमी आहे.
– सस्पेन्शनबद्दल म्हणाल, तर फ्रंटमध्ये 43 मिमी इनव्हर्टेड फोर्क्स दिले आहेत. मागील बाजूस पिगी बॅक मोनोशॉक सस्पेंशन असतील.

Advertisement

– बाईकमध्ये 4 इंचाचा TFT इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे, जो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येतो. यात संपूर्ण एलईडी लाइटिंगसह सिग्नेचर डेमेकर एलईडी हेडलॅम्प आहेत.
– ‘हार्ले-डेव्हिडसन’च्या ‘XR750 फ्लॅट ट्रॅकर’पासून ‘स्पोर्टस्टर एस’ बाईकची सोलो सीट प्रेरित आहे. त्यामुळे ती खूपच मस्क्यूलर दिसते.
– हार्ले-डेविडसन स्पोर्ट्सटर एसमध्ये ११.८ लिटर क्षमतेची पेट्रोल टाकी आहे.

किंमत- सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच ‘हार्ले-डेव्हिडसन’च्या बाईक्स काॅस्टली असतात. या बाईक्सचीही भारतीय बाजारपेठेत एक्स-शोरूम किंमत १५.५ लाख रुपये आहे.

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306018

Advertisement