SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 राशिभविष्य (Horoscope): तुमच्यासाठी संपूर्ण आठवडा कसा असेल? कोणता दिवस अधिक चांगला, जाणून घ्या..

🗓️ रविवार, 5 डिसेंबर 2021 ते शनिवार 11 डिसेंब2021

मेष (Aries) : नोकरी व्यवसायात नवीन काम मिळेल. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अस्वास्थ्य जाणवेल. व्यापार- धंद्याच्या विकासा बरोबरच उत्पन्न वाढेल.

वृषभ (Taurus) : कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. खोट्या गोष्टींचा आधार घ्याल. दिवस कामात व्यस्त राहील. खर्चिक कामे निघतील. मित्रांची भेट होण्याची शक्यता.

मिथुन (Gemini): नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.

कर्क (Cancer) : नवीन ओळख वाढवताना सावध रहा. कौटुंबिक वातावरण काहीसे तप्त राहील. वैवाहिक जीवनात सुख- शांती लाभेल.

सिंह (Leo) : नोकरीत सांभाळून निर्णय घ्या. हलगर्जीपणा करून चालणार नाही. दिवस उत्साही असेल. पत्नी, मुलगा, वडीलधारे यांचेकडून लाभ होईल.

कन्या (Virgo): आनंदी मनाने कार्यरत राहाल. प्रलोभनाला भुलू नका. रखडलेली कामे हळूहळू पुढे सरकतील. व्यायामात खंड पडू देऊ नका.

तूळ (Libra) : थकवा आणि आळस यांमुळे स्फूर्तीची उणीव राहील. मुलांची चिंता सतावेल. जि‍भेवर ताबा ठेवावा. आव्हानांचा सामना करावा.

वृश्चिक (Scorpio) : मनात गाढ चिंता सतत येत राहतील. आज प्रत्येक गोष्टीत नकारात्मक पैलूंचा अनुभव येईल. नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल.

धनु (Sagittarius) : नवीन कार्याला चांगला दिवस. आर्थिक दृष्ट्या सावध राहा. प्रयत्नात कसूर करू नका. हवे असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.

मकर (Capricorn) : नवीन ओळख फायदेशीर ठरेल. नोकरी व्यवसायात अडचणी येतील. आत्ममग्न राहाल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ (Aquarius) : घरामध्ये वेळ खर्च होईल. दिवसभर मन प्रसन्न राहील. भावंडे, मित्र, शेजारी यांच्याशी संबंध चांगले राहतील. कचेरीची कामे मार्गी लागतील.

मीन (Pisces) : मनात मरगळ राहील. कठीण कामे सुलभतेने करू शकाल. केलेल्या कामाचे समाधान वाटणार नाही. कौटुंबिक वातावरणात रमून जाल.

Advertisement