SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सायबर चोरांकडून लोकांच्या बॅंक खात्यांवर ऑनलाईन दरोडा, तुम्हाला आलाय का असा मेसेज..?

सध्या सायबर चोरांचे प्रमाण प्रचंड वाढलेय.. तुमची एक चूकही महागात पडू शकते.. ऑनलाइन बॅंकिंग सोपी, वेगवान झाली असली, तरी त्यामुळे फसवणुकीचे प्रकारही वाढल्याचे पाहायला मिळते.

ऑनलाईन फ्रॉडचा एक वेगळाच प्रकार नुकताच समोर आला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तिघांना अटक केली असली, तर त्यांचा मुख्य सूत्रधार आफ्रिकी नागरिक आहे. त्याच्या इशाऱ्यावर दिल्लीतील हे तिघे लोकांना लूटत असल्याचे तपासात समोर आलेय.. 

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, हे आरोपी चांगला पैसेवाला बकरा शोधत.. विशेषत: त्यांचे लक्ष लाखो-करोडोचे व्यवहार होणाऱ्या करंट नि बिजनेस अकाउंटवर असे.. अशा लाेकांना ते आपल्या जाळ्यात अडकवत. त्यांच्या बँक खात्याचे डिटेल्स काढत…

आफ्रिकी भामटा अशा लोकांना ‘फिशिंग मेल’ पाठवत असे. लोकांना लुटण्यासाठी त्यांनी ‘क्लिक जॅकिंग’ पद्धत वापरल्याचे समोर आलेय.. म्हणजे त्यात युजरला एखाद्या खऱ्या लिंकवर क्लिक करायला सांगायचे नि त्या खऱ्या लिंकमागे फ्रॉड लिंक ठेवून त्यावर पुन्हा क्लिक करायला लावायचे…

Advertisement

कसे लूटले जाते..?
हे भामटे लाेकांच्या मोबाइलवर ‘अल्टरनेट’ मोबाइल नंबर बदलण्यासाठी मेसेज पाठवित. कोणाला खरंच नवीन सिम कार्ड घ्यायचं असेल किंवा मोबाइल नंबर बदलायचा असेल, त्यांना हा मेसेज खरा वाटत असे. अल्टरनेट नंबरसाठी हे लोक लिंकवर क्लिक करीत नि फसले जात.

सिम कार्ड बदलण्यासाठी ‘रिक्वेस्ट’ पाठवल्यावर या व्यक्तींचे ‘कार्ड’ ब्लॉक केलं जात असे. नंतर त्याच नंबरचे सिम काढून हे भामटे लोकांच्या खात्यातून पैसे काढत असल्याचे समोर आलेय..

Advertisement

दिल्लीत 10 लाख लुटले
दिल्लीत अटक केलेल्या या आरोपींनी एकाला अशाच प्रकारे 10 लाख रुपयांना गंडा घातला.. मोबाइल कॉल सेंटरमार्फत त्या व्यक्तीला त्यांच्याच नंबरचे सिम कार्ड एका अनोळखी व्यक्तीने काढल्याचे सांगितले.

पोलिसांनी कॉल सर्व्हिस प्रोव्हाइडर्स आणि बँक सूचनेच्या आधारे या गुन्हेगारांना जेरबंद केले. या भामट्यांनी बनावट वोटर आयडीच्या माध्यमातून हे सिम कार्ड मिळवलं होतं. त्या माध्यमातून ऑनलाइन बँकिंगद्वारे ही फसवणूक केल्याचे तपासात समोर आले.

Advertisement

📣 आता असेच News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081

Advertisement