SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन लागणार..? आरोग्यमंत्र्यांनी काय म्हटलंय, जाणून घेण्यासाठी वाचा..

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या घातक व्हेरिएंट ‘ओमायक्रॉन’मुळे (Omicron) अख्खे जग धास्तावले आहे.. विविध देशांमध्ये या विषाणूचा प्रसार झपाट्याने हाेताना दिसत आहे.. कोरोनावर नियंत्रण मिळत असतानाच हा व्हेरियंट आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

भारतातही सुरुवातीला कर्नाटकमध्ये ‘ओमायक्रॉन’चे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर गुजरातमध्येही एका वृद्धाला त्याची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर सर्वात धक्कादायक म्हणजे, महाराष्ट्रातही या विषाणूने एंट्री केल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झालीय.

Advertisement

डोंबिवलीमधील 33 वर्षीय तरुणाला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे स्पष्ट झालेय. कोरोना संसर्ग कमी झाल्याने महाराष्ट्रातील व्यवहार नुकतेच पूर्ववत होत होते. मात्र, ‘ओमायक्रॉन’मुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनचे सावट महाराष्ट्रावर दाटल्याची चर्चा आहे.

आरोग्यमंत्री टोपे काय म्हणाले..?
याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले.. ते म्हणाले, की “कोरोनाबाबत सावध राहिलो नाही, तर तिसरी लाट ‘ओमायक्रॉन’चीही असू शकते.. दक्षिण आफ्रिकेत ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला असला, तरी पॉझिटिव्ह रुग्णाला आयसीयू, ऑक्सिजन लागत असल्याचे समोर आलेले नाही.”

Advertisement

“‘डब्लूएचओ’ (WHO) कडून या विषाणूबाबत अभ्यास सुरू आहे. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळाल्यावर, महाराष्ट्रात त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील. महाराष्ट्रातील जनतेने घाबरून जाऊ नये. लसीकरण करून घ्यावं, मास्क काढू नये,” असे आवाहन टोपे यांनी केलं.

लाॅकडाऊन लागणार का..?
ते म्हणाले, “कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी राज्य सज्ज आहे, पण सध्या तरी लगेच निर्बंध किंवा लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार नाही. तसं केल्यास लोकांना पुन्हा एकदा मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल नि
लॉकडाऊन लावणे हे आता परवडणारेदेखील नाही…”

Advertisement

दरम्यान, ‘ओमायक्रॉन’ची लागण झालेल्या डोंबिवलीतील तरुणाची प्रकृती व्यवस्थित आहे. त्याला सौम्य त्रास आहे. खोकला आहे. त्याच्यात नेहमीची लक्षणे आढळली होती. त्याची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी केली असता, त्यात तो पॉझिटिव्ह आढळला.

सध्या या रुग्णावर कोविड केअर सेंटरमध्ये सुरू आहे. या तरुणाची प्रकृती उत्तम आहे. कोणतीही अडचण नाही. तसेच या तरुणाने कोरोनाची कोणतीही लस घेतली नसल्याचेही टोपे यांनी सांगितले.

Advertisement

📣 आता असेच News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081

Advertisement