SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पेट्रोलपंप नव्हे, चार्जिंग स्टेशनमधून होणार मोठी कमाई, त्यासाठीच्या अटी काय, किती खर्च येणार, वाचा..!

इंधन दरवाढीमुळे नागरिकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे… देशातील अनेक नामंकित वाहन उत्पादक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केलीय..

इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी सरकारही प्रोत्साहन देते. त्यासाठी खास अनुदान दिले जाते. त्यामुळे मागील काही दिवसांत रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढल्याचे दिसते..

Advertisement

पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किंमती अशाच वाढत राहिल्यास आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicles) मागणी आणखी वाढणार आहे.. तसे झाल्यास पेट्रोलपंप ओस पडतील नि इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशनची गरज वाढणार आहे..

पेट्रोलपंपाऐवजी रस्त्यावर सार्वजनिक चार्जिंग स्टेशनची (Public Charging Stations-PCS) उभारणी केल्यास त्यातून मोठी कमाई करता येईल.. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढेल, तसा या व्यवसायातील नफाही वाढत जाणार आहे.

Advertisement

शिवाय चार्जिंग स्टेशन सुरु करण्यासाठी पेट्रोलपंपासारखे परवाने गोळा करावे लागणार नाहीत. अगदी सामान्य माणसालाही अशी स्टेशन सुरू करता येतील. त्यासाठी लागणारा खर्चही अगदी कमी आहे, उलट त्या तुलनेने या व्यवसायातून मिळणारा फायदाच अधिक आहे.

अर्थात, चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाने (Energy Ministry) काही नियम-अटी जारी केल्या आहेत. चला तर मग याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

चार्जिंग स्टेशनसाठी आवश्यक गोष्टी
– सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी कमीत कमी 300 ते 500 चौरस फूट जागा असावी, जेणेकरून एका वेळी 2-3 कार सहज चार्ज करता येतील.

– पायाभूत सुविधांमध्ये संबंधित सर्व उपकरणांसह एक विशेष ट्रान्सफॉर्मर लागेल. त्यात प्लग-इन नोजल, 33/11 केव्ही केबल, सर्किट ब्रेकर असणं आवश्यक आहे.

Advertisement

– चार्जिंग स्टेशनमध्ये किमान एक इलेक्ट्रिक किऑस्क असायला हवा. ज्यात अनेक चार्जिंग पॉइंट्स असतील नि गरजेनुसार त्यात वाढ करता येईल.

– लांब पल्ल्याच्या, अवजड वाहनांसाठी 100 kW क्षमतेचे दोन चार्जर्स असायला हवेत. वेगवान चार्जर बसविण्यासाठी ‘लिक्विड कूल्ड केबल’ वापरावी लागेल.

Advertisement

– सर्व उपकरणे आयएसओ (ISO) प्रमाणित असावीत. वाहन चार्ज करण्यासाठी ऑनलाइन बुकिंगकरिता ऑनलाइन नेटवर्क सेवा सुरु करावी लागेल. अशी सेवा देणाऱ्या पुरवठादार कंपनीशी संपर्क साधावा लागेल.

– चार्जिंग स्टेशनसाठी जमीन भाड्यानेही घेता येईल. त्यासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र लागेल. सार्वजनिक चार्जिंग स्टेशन सुरु करताना राज्याच्या ऊर्जा विभागाला माहिती द्यावी लागेल.

Advertisement

– विद्युत निरीक्षक अर्थात इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरची मंजुरी घ्यावी लागणार. स्थानिक वितरण कंपनीद्वारे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरची (Electrical Inspector) नियुक्ती केली जाते..

किती खर्च येऊ शकतो..?
सार्वजनिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी साधारण 16.5 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. त्यात वीज, देखभाल, चार्जिंग उपकरणांचा समावेश आहे. चार्जिंग स्टेशन 16 तास सुरू ठेवल्यास प्रति युनिट 3.5 रुपये दराने शुल्क आकारून तुम्ही 4 वर्षांत सगळा खर्च वसूल करू शकता.

Advertisement

📣 आता असेच News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081

Advertisement