SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ शनिवार, 4 डिसेंबर 2021

मेष (Aries) : हातातील काम पूर्ण होईल. आज अधिक मेहनत घ्यावी लागेल. आपले विचार आणि व्यवहार यांत हळवेपणा राहील.

वृषभ (Taurus) : जवळचा प्रवास सुखाचा होईल. आर्थिक गोष्टींकडे अधिक लक्ष दिले तर प्रत्येक कामात यश मिळेल. भाग्योदय होईल.

मिथुन (Gemini): प्रेमातील व्यक्तीसाठी नातेसंबंध दृढ करणारा दिवस. दिवसभर कामाची लगबग राहील. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.

कर्क (Cancer) : दुसर्‍यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. सहकार्‍यांना कमी लेखू नका. भावंडांचे सहकार्य मिळेल. टीमवर्कचे महत्त्व लक्षात घ्यावे.

सिंह (Leo) : प्रियजनांचा सहवास आणि सार्वजनिक सन्मान मिळेल. नोकरीत सहकारी सहकार्य करतील. धावपळीचा दिवस राहील.

कन्या (Virgo): आपल्याच नादात दिवस घालवाल. स्वत:च्याच मताला चिकटून राहाल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. व्यापारात वाढ होईल.

तूळ (Libra) : नोकराकडून आणि मातुल घराण्याकडून लाभ होईल. मित्राची गाठ पडेल. सरकारी कामे पुढे सरकतील. प्रकृतीस जपावे.

वृश्चिक (Scorpio) : स्वत:वर कायम विश्वास ठेवावा. विजय तुमचाच होईल. व्यावसायिक क्षेत्रात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. उत्साहात दिवस जाईल.

धनु (Sagittarius) : वादविवादात आपली सरशी होईल. कामासाठी पैसा खर्च होईल. फार काळजी करू नये. भेट वस्तू मिळतील. दिनचर्येत थोडासा बदल करून पाहावा.

मकर (Capricorn) : स्वादपूर्ण जेवण आणि बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल. आपली जबाबदारी ओळखून काम कराल. तुमची प्रतिमा उंचावेल.

कुंभ (Aquarius) : अधिकची कामे अंगावर पडतील. मंगल प्रसंगांना हजेरी लावाल. आनंददायक प्रवास होतील. निर्णयाचा पुनर्विचार करावा.

मीन (Pisces) : चुकीच्या वादविवादामुळे भांडण निर्माण होईल. जुनी देणी फेडाल. घरात शांतता ठेवावी. अनावश्यक खर्चाला कात्री लावावी.

Advertisement