महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ‘एमपीएससी-2021’ साठी राज्यसेवा परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. तसेच 2022 ची राज्यसेवा परीक्षा जून ते ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे..
‘एमपीएससी-2021’ची पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी होईल. या परीक्षेचा निकाल मार्चपर्यंत जाहीर होऊ शकतो.. तर मुख्य परीक्षा 7, 8 आणि 9 मे 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट-2022 मध्ये जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. pic.twitter.com/TSNOZ64woC
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) December 4, 2021
Advertisement
परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक
राज्यसेवा परीक्षा 2021
पूर्व परीक्षा : दिनांक 2 जानेवारी 2022
मुख्य परीक्षा : 07, 08 आणि 09 मे 2022
दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2021
पूर्व परीक्षा : 12 मार्च 2022
मुख्य परीक्षा : 02 जुलै 2022
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021
पूर्व परीक्षा : 26 फेब्रुवारी 2022
मुख्य परीक्षा : 09 जुलै ते 31 जुलै 2022
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021
पूर्व परीक्षा : 03 एप्रिल 2022
मुख्य परीक्षा : 06 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर 2022
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021
पूर्व परीक्षा : 30 एप्रिल 2022
मुख्य परीक्षा : 24 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर 2022 दरम्यान
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2021
पूर्व परीक्षा : 16 एप्रिल 2022
मुख्य परीक्षा : 3 जुलै 2022
राज्यसेवा परीक्षा – 2022
पूर्व परीक्षा : 19 जून 2022
मुख्य परीक्षा : 15 16 व 17 ऑक्टोबर 2022
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022
पूर्व परीक्षा : 08 ऑक्टोबर 2022
मुख्य परीक्षा : 24 डिसेंबर 2022 ते 14 जानेवारी 2023
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022
पूर्व परीक्षा : 5 नोव्हेंबर 2022
मुख्य परीक्षा : 4 फेब्रुवारी 2023 ते 11 मार्च 2023 दरम्यान
महाराष्ट्र राज्यपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022
पूर्व परीक्षा : 26 नोव्हेंबर
मुख्य परीक्षा : 18 मार्च ते 23 एप्रिल 2023 दरम्यान होणार
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2022
पूर्व परीक्षा : 10 डिसेंबर 2022
मुख्य परीक्षा : 30 एप्रिल 2023
कोरोनामुळे २०२२ मधील स्पर्धापरीक्षा होतील की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत होती. शिवाय राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्याने, यंदा पदभरती होणार नाही किंवा पुढे ढकलण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत होते
दरम्यान, ‘एमपीएससी’ने याबाबत अधिकृत माहिती प्रसिद्ध करून पदभरतीच्या परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता आयोगाकडून थेट हे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे..
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081