SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग: शिक्षक पात्रता परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, तुम्हीही परीक्षा दिली असेल, तर वाचा..

राज्यातील राज्य परीक्षा परीषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची (MTET) उत्तरतालिका (Maharashtra TET 2021 Answer Key 2021 Released) जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांनी टीईटीची परीक्षा दिली होती, ते mahatet.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उत्तरपत्रिका पाहू शकतात. तसेच ती उत्तरपत्रिका डाऊनलोडही करु शकतात.

टीईटी पेपर 1 आणि 2 या दोन्ही विषयांच्या परीक्षेचं आयोजन हे 21 नोव्हेंबरला करण्यात आलं होतं. राज्य परीक्षा परीषदेने पेपर 1, पेपर II-गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांची उत्तरतालिका अधिकृत वेबसाईटवर अपलोड केली आहे. यासोबतच राज्य परीक्षा परीषदेने विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका आक्षेप नोंदवण्यासाठीची मुदतही दिली आहे.

Advertisement

Answer Key कशी डाऊनलोड करणार?

▪️ mahatet.in या लिंकवर क्लिक करून अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Advertisement

▪️ वेबसाईटवर होमपेज ओपन होईल. तिथे Interim Answer Key या लिंकवर क्लिक करा.

▪️ आता नवीन विंडो ओपन होईल, ज्यात पेपरचे पर्याय असतील.

Advertisement

▪️ नवीन विंडो ओपन झाल्यावर Paper I Interim Answer Key, Paper II Maths Science Interim Key, Paper II Social Science Interim Answer Key या पेपरसंबंधित प्रत्येक लिंकवर क्लिक करा.

▪️ नवीन विंडो ओपन होईल. मग तुम्हाला हवी असलेली उत्तरपत्रिका चेक करा, ती पीडीएफ डाऊनलोड करा आणि भविष्यात उपयोगी पडत असेल, तर त्याची प्रिंटआऊट काढा.

Advertisement

आक्षेप नोंदवण्याची मुदत किती तारखेपर्यंत?

जर तुम्ही परीक्षा दिली असेल आणि काही आक्षेप असेल, तर टीईटीचे विदयार्थी 8 डिसेंबरपर्यंत या उत्तरपत्रिकेबाबत आक्षेप नोंदवू शकतात. विद्यार्थी त्यांची असलेली तक्रार ही [email protected] या मेलआयडीवर जाऊन नोंदवू शकतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081

Advertisement