फायद्याची गोष्ट: फक्त 999 रुपयांत आरोग्य विमा काढा आणि तब्बल 13 फायद्यांसह मिळवा लाखोंचा लाभ, वाचा..
आजच्या जगात कोरोना ऑनलाईन पद्धतीने होत आहे. त्यामुळे या क्षेत्रातही आता स्पर्धा वाढली आहे. कोरोनाच्या संकटात आरोग्य विम्याचे महत्व सर्वांच्या लक्षात आले आहे. डिजिटल पेमेंट सेवा देणाऱ्या कंपन्या आता या सेवाही देत आहेत. आता ‘फोन पे’ ने आपल्या युजर्ससाठी आरोग्य विमा योजना आणली आहे.
आरोग्य विम्याविषयी सविस्तर माहिती…
फोन-पे ॲपच्या माध्यमातून आरोग्य विमा काढण्यासाठी तुम्हाला कसल्याही प्रकारची आरोग्य तपासणी (Health Checkup) किंवा तपासणी अहवाल (Report) द्यायची गरज नाही. तुम्ही फक्त तुमचं नाव, वय आणि ई-मेल आयडी इ. काही माहिती घरबसल्या भरून विमा घेऊ शकता. अगदी कमी पैशांत तुम्हाला हा विमा मिळणार आहे. तुम्हाला वाटेल की, यापेक्षा कमी किंमतीत आरोग्य विमा येतो, पण येत जरी असेल तरी या आरोग्य विम्यांतर्गत जो लाभ आहे तो अधिक आहे.
तुम्ही फोन-पे वापरत (phone pe User) असाल, तर हा प्लॅन तब्बल 13 फायद्यांसह फक्त 999 रुपयांना (Health Insurance plan rs. 999) तुम्हाला मिळणार आहे. महत्वाचं म्हणजे तुमच्या फक्त या थोड्याशा पैशांमुळे तुम्हाला (फक्त विमा घेणाऱ्या व्यक्तीला) 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण प्राप्त होते. आपलं आरोग्य अबाधित राहावं असं जर आपल्याला वाटत असेल किंवा कोरोनाच्या काळात ही गोष्ट महत्वाची म्हणून वाटत असेल, तर तुमच्या सोईनुसारही तुम्ही कोणताही आरोग्य विमा घेऊ शकतो.
अधिक माहिती अशी की, या Health Insurance Plan मध्ये जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल व्हाल, तर त्यानंतरचा खर्चही तुम्हाला मिळणार आहे. अर्थात याचे प्रमाण ठरलेले आहे. तरी आयसीयू, डे-केअर प्रक्रिया, रुग्णवाहिका खर्च आणि आयुष उपचारांचा खर्चाचा यात समावेश आहे. पॉलिसी चालू झाल्यानंतर 30 दिवसानंतर कोरोना झाल्यास तर तुम्हाला लाभ मिळणार आहे. यात डोळ्याच्या सर्जरीसाठीही लाभ मिळणार आहे. त्यासोबतच 7 हजार 300 रुग्णालयांमध्ये कॅशलेस सुविधाही उपलब्ध आहे. म्हणून याचा लाभ तुम्हाला बहुतांश ठिकाणी घेता येणार आहे. या प्लॅनमध्ये लाइफटाइम रिन्यूएबिलिटी फीचरही मिळते.
तुम्हाला जास्त फायदे हवे असतील, तर तुम्ही
1 हजार 999 रुपये भरून 2 लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण मिळवू शकता आणि 3 लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण मिळविण्यासाठी 2 हजार 649 रुपयांचा प्लॅन घेऊ शकता. असे तीन प्रकार यामध्ये देण्यात आले आहेत. सध्याच्या परिस्थितीत कोरोना किंवा अन्य आजारपणात दवाखान्यात होणारा खर्चही आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे आरोग्य विमा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. तुमच्या बजेटनुसार तुम्ही ते घेऊ शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081