SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एटीएम मशीनमध्ये पैसे अडकले, तरी मिळतात परत..! ‘आरबीआय’ने बॅंकांना दिल्यात ‘या’ सूचना..

‘एटीएम’ आल्यापासून बॅंकेचे हेलपाटे वाचले.. तास न् तास रांगेत उभे राहण्याचे कष्ट कमी झाले… एका क्लिकवर तुमच्या हक्काचा पैसा हातात पडू लागला.. आता डिजिटल व्यवहाराचे प्रमाण वाढल्याने अनेकांच्या खिशात कोऱ्या करकरीत नोटाही दिसत नाहीत….

असे असले, तरी अजूनही पैसे काढण्यासाठी अनेक जण ‘एटीएम’चाच वापर करतात.. गरज पडली, की नागरिकांची पावले आपसूकच ‘एटीएम’च्या (Bank ATM) दिशेने वळतात..

Advertisement

दरम्यान, ‘एटीएम’मधून पैसे काढताना एक ठराविक प्रक्रिया करावी लागते. त्यानंतरच हे मशीन तुम्हाला पैसे देते.. मात्र, बऱ्याचदा सगळी प्रक्रिया योग्य रित्या करुनही ‘एटीएम’मधून पैसे काही बाहेर येत नाहीत.. मात्र, तुमच्या खात्यातून पैसे कट झाल्याचा मेसेज मोबाईलवर दिसतो.

बऱ्याचदा तांत्रिक अडचणीमुळे मशीनमधून पैसे बाहेर येत नाहीत.. मशीनमध्येच अडकतात. अनेक वेळा सर्व्हर डाऊन झालेले असल्याने पैसे ऑनलाइन अडकतात. मात्र, अशा वेळी जाम टेन्शन येतं. मात्र, एटीएममध्ये पैसे अडकले, तरी घाबरण्याचे कारण नाही..

Advertisement

एटीएममध्ये पैसे अडकल्यास काय कराल..?

– सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही एटीएममधून पैसे बाहेर आले नाही, मात्र खात्यातून कापले गेल्यास अस्वस्थ होऊ नका. एटीएममधून येणारी ‘ट्रान्झॅक्शन स्लिप’ (Transantion slip) जपून ठेवा.. समजा, एटीएममधून ट्रान्झॅक्शन स्लिप मिळाली नसेल, तर बँक स्टेटमेंट काढू शकता.

– बॅंकेच्या शाखेकडे खातेदाराला लेखी तक्रार द्यावी लागते. त्यावेळी व्यवहाराच्या स्लिपची छायाप्रत जोडावी लागते. त्यात व्यवहाराची वेळ, ठिकाण, एटीएम आयडी नि बँकेचा प्रतिसाद कोडही छापलेला असतो. त्यामुळे ही स्लिप आवश्यक आहे.

Advertisement

– रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, बँकांना एका आठवड्यात तुमचे पैसे परत करावे लागतात. ते न दिल्यास तुम्ही बँकिंग लोकपालशी संपर्क साधू शकता. आठवडाभरानंतरही ग्राहकाने पैसे परत न केल्यास, बँकेला रोज 100 रुपये दंड केला जातो.

– एटीएममध्ये पैसे अडकल्यावर तातडीने ‘कस्टमर केअर’ला कॉल करा. जर तेथेही योग्य प्रतिसाद मिळाला नाही, तर तुमच्या बँकेच्या शाखेत याबाबत तक्रार नोंदवू शकता.

Advertisement

📣 आता असेच News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081

Advertisement