कोरोना काळात अनेकांना नोकऱ्यांवर पाणी सोडावे लागले, काहींच्या पगारात कपात झाली होती. मात्र, कोरोना संसर्ग कमी झााल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली.. त्यामुळे कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ केली होती.
कंपन्यांनी वेतन वाढविल्याने कर्मचारी आनंदात होते. मात्र, त्यांच्या या आनंदाला आता ग्रहण लागण्याची चिन्हे आहेत. वेतनवाढ दिल्याने आता हातात येणारा पगारही (Salary) मोठा असेल, असे कर्मचाऱ्यांना वाटत होते.. मात्र, थांबा.. तसे काहीही होणार नाही… उलट तुमच्यावर कराचा बोजा वाढणार आहे..
नेमकं कारण काय..?
आता कर्मचाऱ्यांना प्रश्न पडला असेल, की असे कसे होऊ शकते.. तर मोदी सरकारने नवीन वेज कोड (New Wage Code), म्हणजे नवीन वेतनसंहिता आणली आहे.. ती लागू झाल्यानंतर हातात येणाऱ्या पगाराला (In hand Salary) मोठ्या प्रमाणात कात्री लागणार आहे.. शिवाय करही वाढू शकतो.
कर्मचाऱ्यांना ‘कॉस्ट टू कंपनी’ (Cost-to-company) या धोरणानुसार पगार दिला जात असतो. या ‘सीटीसी’मध्ये काही महत्वाचे घटक असतात. ते म्हणजे, मूळ वेतन (Basic Salary), हाउस रेंट अलाउंन्स (HRA), पीएफ (PF), ग्रॅच्युईटी (Gratuity), पेन्शन (Pension), एलटीए, एंटरटेनमेंट अलाउंन्स..
नवीन वेज कोडनुसार, आता कोणत्याही कर्मचाऱ्याचे भत्ते हे त्याच्या मूळ पगारापेक्षा जास्त असणार नाहीत. म्हणजे, एकूण वेतनापेक्षा भत्त्यांचे वेतनातील प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जादा असता कामा नये.
उदा. कर्मचाऱ्याचा पगार ५०,००० रुपये असेल, तर त्याची बेसिक सॅलरी २५,००० रुपये होईल. त्यानंतर त्याचे इतर भत्ते २५,००० रुपयांमध्ये होतील.. म्हणजेच सर्व कंपन्यांना आता कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात वाढ करावी लागणार आहे..
आतापर्यंत कंपन्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार २५ ते ३० टक्के ठेवत व मोठ्या प्रमाणात भत्त्यांतून पगार देत असत.. मात्र, आता कंपन्यांना तसे करता येणार नाही.. मूळ पगार ५० टक्क्यांपेक्षा कमी ठेवता येणार नाही. अशा वेळी कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांतच कपात करावी लागणार आहे.
पीएफच्या रकमेत वाढ होणार
बेसिक सॅलरीच्या 12 टक्के रक्कम ‘पीएफ’साठी (Provident fund) कापली जाते.. त्यामुळे भत्ते कमी करुन बेसिक पगार वाढविल्यास १२ टक्क्यांचे योगदानही वाढणार. याच पद्धतीने ‘ग्रॅच्युईटी’च्या रकमेतही वाढ होईल नि कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या पगारात घट होईल.
नवीन वेज कोडनुसार, ज्यांचा पगार जास्त आहे, त्यांना अधिक कर भरावा लागणार आहे. कारण, या कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन वाढल्याने त्यानुसारच कर आकारणी केली जाणार.. कमी पगार असणाऱ्यांना कमी कर द्यावा लागेल.
📣 आता असेच News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081