SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुम्हाला धमाकेदार 5G स्मार्टफोन घ्यायचाय? तर जाणून घ्या ‘या’ पाच स्मार्टफोनबद्दल..

पुढील आठवड्यात म्हणजेच डिसेंबरच्या सुरुवातीला लॉंच होणार आहेत. यापैकी काही स्मार्टफोन्स (Smartphones) आधीच जागतिक स्तरावर लॉंच केले गेले आहेत, तरीही ते भारतीय बाजारपेठेत आलेले नाहीत. यावेळी स्मार्टफोन आहेत जे वर्ष संपण्यापूर्वी लॉंच होऊ शकतात.

दमदार फीचर्स असलेले 5 स्मार्टफोन..

Advertisement

▪️ शाओमी-12 स्मार्टफोन: शाओमी-12 (Xioami-12) अंदाजे लॉंच 12 डिसेंबरला लॉंच होऊ शकतो. हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉंच केला जाईल आणि पुढील वर्षात जागतिक स्तरावर लॉंच केला जाईल. रिपोर्टनुसार, या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 SoC प्रोसेसर, 50 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल. Xiaomi 12 सोबतच Xiaomi 12X आणि Xiaomi 12 Pro अशी सीरीजही लॉंच होऊ शकते, असं समजतंय.

▪️ OnePlus 9RT स्मार्टफोन: आगामी OnePlus 9RT 5G स्मार्टफोन नुकताच चीनी बाजारात लॉंच झाला. भारतीय बाजारात हा स्मार्टफोन डिसेंबरमध्ये दाखल होऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 888 प्रोसेसर, 65W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि 50 मेगापिक्सेल Sony IMX766 प्रायमरी कॅमेरा दिला गेला आहे.

Advertisement

▪️ Moto G200 स्मार्टफोन: भारतात लाँच होणार्‍या स्मार्टफोनपैकी एका स्मार्टफोनचे नाव Moto G200 असू शकते. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन888 प्लस दिला जाईल. तसेच Moto G200 ची UK मध्ये एंट्री झाली आहे. या स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा दिला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली जाईल, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

▪️ Moto G51 5G स्मार्टफोन: मोटोरोला कंपनी भारतात Moto G51 5G स्मार्टफोन डिसेंबर 2021 मध्ये लॉंच करणार आहे. यात Snapdragon 480+ प्रोसेसर दिला जाईल. हा स्मार्टफोन Zee स्मार्टफोन लाइनअपमध्ये येणारा पहिला 5G स्मार्टफोन असणार आहे, ज्याची किंमत 20 हजार रुपयांच्या जवळपास असेल. या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले, 50 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपही दिला जाईल.

Advertisement

▪️ Micromax In Note 1 Pro स्मार्टफोन: Micromax In Note 1 Pro हा भारतीय मायक्रोमॅक्स कंपनीचा स्मार्टफोन फोन पुढील महिन्यात भारतीय बाजारात दाखल होणार आहे. माहीतीनुसार, Micromax In Note 1 Pro मध्ये MediaTek Helio G90 प्रोसेसर आणि स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम दिली जाणार आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन Android 10 वर काम करणार असल्याचे बोलले जात आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081

Advertisement