देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या 6 डिसेंबर रोजी रायगड किल्ल्याला भेट देत आहेत. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे हेलिकॉप्टर रायगड किल्ल्यावर उतरवले जाणार आहे. मात्र, यावरून वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत. याचे कारण म्हणजे शिवप्रेमींनी रायगड किल्ल्यावर उतरवण्याला विरोध दर्शवला आहे.
राष्ट्रपतींच्या दौऱ्याला विरोध नाही, पण…,
काही काळापूर्वी किल्ले रायगडावर असणाऱ्या होळीच्या माळावर हॅलिपॅड होते. तिथे हॅलिकॉप्टर उतरताना किंवा उड्डाण घेताना प्रचंड धूळ, माती आणि केर-कचरा उडत असे. ही धूळ, माती होळीच्या माळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर उडत असे. हा मुख्य मुद्दा राज्यातील शिवप्रेमींचा आहे.
तरी 1996 साली या ठिकाणी उपोषण करून हा हॅलिपॅड येथून काढून टाकला होता. त्यानंतर आजमितीला 25 वर्षांनंतर राष्ट्रपती रामनाथ काेविंद (ramnath kovind) यांच्या किल्ले रायगडावरील (raigad) दाै-याच्या पार्श्वमीवर आता पुन्हा शिवरायांच्या अपमानाचा तोच प्रश्न पुन्हा समोर आलाय, शिवप्रेमींना असं वाटत आहे. म्हणूनच शिवप्रेमींकडून राष्ट्पतींचे हेलिकॉप्टर हाेळीचा माळ येथे उतरवण्याला मोठा विरोध केला जात आहे.
दरम्यान हेलिकॉप्टर हाेळीचा माळ येथे उतरवल्यास या ठिकाणी हेलिकॅप्टरमुळे हाेणारा कचरा, धूळ ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर जाते, हे अवमानकारक आहे. त्यामुळे राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर माळावर उतरविण्यासाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी शिवप्रेमींनी सरकारकडे केली आहे.
यापूर्वी देखील देशातील मंत्री असो वा कोणीही प्रतिष्ठित व्यक्तीसाठी रायगडावर हेलिकॉप्टर उतरविले गेले होते. मात्र त्या त्या वेळी होळीच्या माळावरील महाराजांच्या पुतळ्यावर मोठ्या प्रमाणावर माती व धुळीचे कण उडाल्यामुळे राज्यातील शिवप्रेमींममध्ये नाराजीचे वातावरण होते आणि प्रसंगी कारवाईची मागणीही झाली आहे.
रायगड किल्ल्यावर तसे तीन ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. पहिला व मुख्य पुतळा राजसदरेवर मेघडबंरीत आहे आणि दुसरा होळीचा माळ या ठिकाणी आहे. या पुतळ्यासमोर होळीकरिता व दांडपट्टा तसेच तलवारबाजी, तसेच लढाईच्या अभ्यासाकरीता मैदान आहे. तसेच, समाधीच्या ठिकाणी तिसरा पुतळा आहे. शिवप्रेमी अनेक समस्या सोडविण्यासाठी नेहमीच मोहीम राबवत असतात. आता सध्या Whatsapp, Meta, Instagram अशा सोशल मीडियावर चर्चा निषेध व्यक्त केला जात आहे
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081