SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नवीन वर्षात किती सुट्या मिळणार..? किती सुट्यांवर पाणी सोडावे लागणार..?

नवीन वर्षाची सर्वांनाच उत्सुकता असते.. डिसेंबर महिना सुरु झाला, की सर्वांचे लक्ष नववर्षाच्या स्वागताकडे लागलेले असते. त्यासाठी जोरदार तयारीला वेग आलेला असतो. सोबतच नवीन वर्षात किती सुट्या मिळणार, याकडे नोकरदार वर्ग लक्ष ठेवून असतो..

सुट्यांच्या निमित्ताने बाहेर फिरायला जाण्याचे, घरातील मंगल कार्य उरकण्याचे वा इतर कामाचे नियोजन नोकरदार वर्ग करीत असतो. या सुट्यांच्या निमित्ताने त्याला काही काळासाठी विसावा घेता येतो..

Advertisement

यंदाच्या वर्षातील (2021) अखेरचा महिना डिसेंबर सुरु झाला आहे. आता सर्वांना 2022 या नवीन वर्षाची चाहूल लागली आहे. अजून पूर्ण महिना जायचा बाकी असला, तरी आतापासून नवीन वर्षाच्या आगमनाची तयारी सुरू झालीय.

नोकरदार वर्गासाठी सुट्यांच्या दृष्टीने 2022 हे वर्ष खास असणार आहे. 2021 प्रमाणे 2022 मध्येही एकूण 42 सरकारी सुट्ट्या मिळणार आहेत. मात्र, अनेक हाॅलीडे शनिवारी-रविवारी आल्याने सुट्यांचे प्रमाण काहीसे कमी झाल्याचे दिसत आहे.

Advertisement

2022 मधील सुट्ट्यांची यादी

जानेवारी

Advertisement
 • 1 जानेवारी – नवीन वर्ष
 • 14 जानेवारी – मकर संक्रांती / पोंगल
 • 26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन

फेब्रुवारी

 • 5 फेब्रुवारी – वसंत पंचमी
 • 15 फेब्रुवारी – हजरत अली यांचा जन्मदिवस
 • 16 फेब्रुवारी – गुरु रविदास जयंती
 • 26 फेब्रुवारी – महर्षी दयानंद सरस्वती जयंती
 • 28 फेब्रुवारी – महाशिवरात्री

मार्च

Advertisement
 • 17 मार्च – होलिका दहन
 • 18 मार्च – डोलीयात्रा
 • 20 मार्च – शिव जयंती / पारशी नववर्ष

एप्रिल

 • 1 एप्रिल – चैत्र सुखलदी
 • 13 एप्रिल – बैसाखी
 • 14 एप्रिल – महावीर जयंती
 • 15 एप्रिल – गुड फ्रायडे
 • 17 एप्रिल – इस्टर
 • 29 एप्रिल – जमात उल विदा

मे

Advertisement
 • 7 मे – रवींद्रनाथ जयंती
 • 15 मे – बुद्ध पौर्णिमा

जून – 30 जून – रथयात्रा

जुलै – 30 जुलै – मोहरम-आशुरा

Advertisement

ऑगस्ट

 • 11 ऑगस्ट – रक्षाबंधन
 • 15 ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन
 • 18 ऑगस्ट – जन्माष्टमी
 • 30 ऑगस्ट – गणेश चतुर्थी-विनायक चतुर्थी

सप्टेंबर – 7 सप्टेंबर – ओणम

Advertisement

ऑक्टोबर

 • 2 ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती
 • 4 ऑक्टोबर – दसरा
 • 8 ऑक्टोबर – मिलाद-उन-नबी
 • 9 ऑक्टोबर – महर्षि वाल्मिकी जयंती
 • 24 ऑक्टोबर – नरक चतुर्दशी – दिवाळी
 • 25 ऑक्टोबर – गोवर्धन पूजा
 • 26 ऑक्टोबर – भाई दूज
 • 30 ऑक्टोबर – छठ पूजा

नोव्हेंबर –  24 नोव्हेंबर – गुरु तेग बहादूर हुतात्मा दिन

Advertisement

डिसेंबर – 25 डिसेंबर – ख्रिसमस डे

किता सुट्ट्यांवर पाणी सोडावे लागणार..?
2022 मध्ये अनेक सुट्या शनिवार-रविवारी येत आहेत. त्यामुळे वर्षभरात एकूण 12 सुट्ट्या वाया जाणार आहेत. नवीन वर्षाची सुरुवातच शनिवारपासून होतेय. शिवाय 5 फेब्रुवारीला वसंत पंचमी, 26 फेब्रुवारीला दयानंद सरस्वती जयंती ही शनिवारी आलीय.

Advertisement

तसेच रविवारी 20 मार्च रोजी शिवजयंती असेल. ईस्टर, गुड फ्रायडे, मोहरम, महात्मा गांधी जयंती, महर्षी वाल्मिकी जयंती, छठ पूजा, मिलाद-उन-नबी आणि ख्रिसमस हे सण वीकेंडला येत आहेत.

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081

Advertisement