आपल्या मातीवर आपलं एक विशेष प्रेम असतं. बळीराजासाठी तर ती ‘काळी आई’ असते.. बालपणी आपल्यापैकी अनेकांनी माती खाल्ली असेल.. नंतर ही सवय बंद झाली असेल.. मात्र, ही माती खाण्याचे व्यसन जडल्याचे पाहिलंय का..?
माती खाण्यातून काहींना एक प्रकारची नशा चढते, असे म्हटलं तर खरं वाटणार नाही.. पण हो आपल्या मराठी मातीत अशी माती खाणारी माणसं आहेत.. या मातीने या माणसांना अक्षरक्ष: वेड लावलंय.. मग ती लहान मुले असो वा म्हातारे.. महिला असो वा पुरुष. माती खाण्यात सारेच पुढे आहेत…
बुलढाणा जिल्ह्यातील काही नागरिक या मातीचं व्यसन करीत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. विशेष म्हणजे, बुलढाण्यात या मातीची चक्क मोठ्या प्रमाणात विक्रीही होते नि त्यावर आणखी एक आश्चर्य म्हणजे, ही माती चक्क दुकानात विकत मिळते..
ही साधीसुधी माती नाही.. तर ही एक विशिष्ट प्रकारची माती राजस्थानात मिळते. तेथून ती बुलढाण्यात आणून विकली जाते.. 1 रुपयाला 25 ग्रॅम.. पाकिटबंद मातीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.. बुलढाणा जिल्ह्यातील वृद्धांपासून ते लहान मुलं नि महिलांनाही ही माती खाण्याचे व्यसन लागलेय..
माती तपासणीचे धक्कादायक निष्कर्ष
लहान-थोरांना वेड लावणाऱ्या या मातीची कृषी महाविद्यालयातील वैज्ञानिकांनी तपासणी केली असता, त्यातून धक्कादायक निष्कर्ष समोर आला.. तो म्हणजे, या मातीत मोठ्या प्रमाणात ‘कॅल्शियम’चं प्रमाण असल्याचे समोर आले..
या मातीत चक्क 21.25 टक्के कॅल्शियम, तर इतर घटक अत्यल्प प्रमाणात असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, नशा चढू शकेल, असा कुठलाही रासायनिक घटक या मातीत आढळला नसल्याचे कृषी महाविद्यालयातील माती परीक्षण केंद्राच्या वैज्ञानिकांनी सांगितले.
दरम्यान, बुलढाण्यातील अनेक किराणा दुकानांत ‘माला माती’ किंवा ‘मुलतानी माती’ म्हणून ती विकली जाते… मात्र, मातीच्या अति सेवनाने अनेकांना पोटाचे विकार, मानसिक आजार उद्भवले आहेत. असे माती खाणारे अनेक जण या उपचारांसाठी डॉक्टरांकडे येत असल्याचे सांगण्यात आले..
माती खाण्यावर कोणाचेही नियंत्रण नाही.. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातही त्याचं व्यसन वाढत आहे. मात्र, त्यामुळे शरीराला मोठी हानी होऊ शकते. अति माती खाण्याने ‘कॅल्शियम’चा ओव्हरडोस होऊ शकतो व हे शरीरासाठी घातक ठरु शकेल..
माती खाण्याचे दुष्परिणाम…
मानवी शरीरात साधारणपणे कॅल्शियमचं प्रमाण 8.5 ते 10.2 मायक्रो ग्रॅम / पार्ट असते, तर या मातीत कॅल्शियमची मात्रा 21.25 टक्के आढळली आहे. माती खाण्याने शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण प्रचंड वाढून त्याचा किडनीवर दुष्परिणाम होऊ शकतो. किडनीची कार्यक्षमता कमी होऊ शकते.
माती खाण्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे वारंवार तहान लागते.. भुकेवरही परिणाम होऊन पचनसंस्था बिघडते. अधिक कॅल्शियममुळे शरीरातील हाडे नाजूक होतात. कॅल्शियम वाढल्याने मेंदूवर परिणाम होऊ शकतो.
अनेकदा चक्कर येणे, थकवा जाणवणे, डिप्रेशनमध्ये जाणे, तसेच हृदयगती कमी-जास्त होऊ शकते. त्यामुळे माती खाण्याचे हे व्यसन शरीरासाठी मोठे हानीकारक ठरण्याची चिन्हे आहेत..
टीप : वरील सर्व बाबी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यात स्प्रेड इट कोणताही दावा करीत नाही.
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081