SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सावधान! तुम्हीही रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावता? मग ‘हे’ वाचाच..

आजच्या धावपळीच्या जगात स्मार्टफोनचा वाढता वापर आणि आपलं काळजीने स्मार्टफोन न वापरण्याचं असं दोन्ही प्रमाण वाढलं आहे. अनेकदा आपण ऐकलं असेल की, अमुक अमुक व्यक्तीच्या स्मार्टफोनचा स्फोट झाला, पण यात फक्त स्मार्टफोन कंपनीच जबाबदार ठरते की आपणही? हे बघायला हवं. विशेषतः फोन बंद होणे, बॅटरी फार गरम होणे आणि फोनचा स्फोट होणे यासारख्या दुर्घटना घडतात.

स्मार्टफोन तुम्हीही रात्रभर चार्जिंगला लावत असाल, तर..(Do you charge your smartphone overnight?) 

Advertisement

स्मार्टफोन आणि बॅटरीचे नुकसान: स्मार्टफोनची बॅटरी सतत चार्ज करावी लागत असेल, तर तुमची बॅटरी खराब झालेली असेल, असं समजा. अनेकदा आपण फोन चार्जिंगला लावून वापरतो. मग बॅटरीवर लोड येतो ज्यामुळे शॉर्ट सर्किट होणे, बॅटरी जास्त गरम होणे आणि असे काही प्रकार होतात. जेव्हा बॅटरी संपते आणि चार्ज संपूर्ण झाली तरी चार्जिंग झाली तरी तशीच ठेवतो म्हणून बहुतेक प्रकरणांमध्ये बॅटरी फुगल्याचंही आपण पाहतो. ती मागील पॅनेलकडे पाहून ओळखता येते. मग स्मार्टफोन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन एकदा दाखवावा.

▪️ कोणतंही चार्जर वापरणे: स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट होण्यामागे आपण आपल्या स्मार्टफोन कंपनीचेच चार्जर न वापरणे होय. म्हणून कंपनी नेहमी स्मार्टफोन यूजर्सला अधिकृत चार्जर वापरण्यास सांगते. आपल्या चार्जर व्यतिरिक्त स्मार्टफोन चार्ज करणे नेहमीच नुकसानकारक असू शकते. बहुतेक स्वस्त आणि अप्रमाणित चार्जर फोन जास्त गरम करू शकतात आणि बॅटरी फुगते (The battery of smartphones swells) किंवा खराब होते.

Advertisement

▪️ रात्रभर चार्जिंग, जीवावर बेतणार: तुम्ही स्मार्टफोन रात्रभर चार्जिंग केला तर बॅटरी काही दिवसांनी फुगल्याशिवाय राहत नाही. ती बॅटरी रिमूव्हेबल असली तर चेक करू शकतो पण इनबिल्ट असली तर आपल्याला घरच्या घरी चेक करता येत नाही. मग बॅटरी बॅटरीवर लोड येऊन ती फुगल्याने कधी कधी तिचा स्फोटही होतो. म्हणून अशी सवय जीवावर बेतू शकते. दीर्घकाळ चार्जिंग केल्याने ओव्हरहीटिंग (Overheating in smartphone) शॉर्ट-सर्किट होऊ शकतो. बॅटरी चार्जिंग पातळी 100 टक्के असते, तेव्हा बऱ्याच नवीन स्मार्टफोन्समध्ये चिप्स आपोआप विद्युत प्रवाह थांबवण्याच्या क्षमतेसह देण्यात येतात, परंतु असे थोडे जुने स्मार्टफोन्स आहेत की, या क्षमतेसह येत नाहीत.

▪️ स्मार्टफोन थेट सूर्यप्रकाशात ठेवणं पडेल महागात: स्मार्टफोनची बॅटरी थेट सूर्यप्रकाश अथवा पाण्याच्या संपर्कात आल्याने बॅटरीचा स्फोट होऊ शकतो. जास्त उष्णता पेशी अस्थिर करू शकते आणि ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड सारख्या वायू तयार करू शकते, ज्यामुळे बॅटरी फुगते आणि शेवटी स्फोट होऊ शकतो. फोन पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारे प्रभावित होऊ शकतो. म्हणून तुमचा फोन पाण्यापासून किंवा थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा.

Advertisement

▪️ मल्टी-टास्किंगने ओव्हरलोड: आजकाल नव्या युगात गेमिंग मुलांवर जास्त प्रभाव टाकत आहे. चार्जर मोबाईलला लावून अनेक जण गाणी, इंटरनेट चालू ठेवून गेम खेळत असतात. अशा अनेक गोष्टी मोबाईल/ स्मार्टफोन चार्जिंगला लावून करत असाल, तर बॅटरीवर आणि प्रोसेसरवर लोड येऊन फोन जास्त गरम होऊ शकतो आणि बॅटरी खराब होऊ शकते किंवा स्फोट होऊ शकतो. अशा घटना टाळण्यासाठी, OEM ने थर्मल लॉक वैशिष्ट्य जोडण्यास सुरुवात केली आहे, यात फोन गरम होण्याच्या समस्या नियंत्रणात राहतात. फोन मल्टी-टास्किंग किंवा गेमिंगदरम्यान गरम होत असल्यास, त्याला जरा विश्रांती घ्यावी किंवा आधी चार्जिंग (किमान 80-90% पर्यंत) होऊ द्यावा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081

Advertisement