SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

व्होडाफोन-आयडियाची धूर्त खेळी.., मुकेश अंबानी संतापले, जिओने केली ट्रायकडे तक्रार..!

भारतातील टेलिकॉम कंपन्यांमध्ये (Indian Telecom Companies) सध्या कमालीची स्पर्धा सुरु आहे.. रिलायन्स जिओने (Relience Jio) टेलिकाॅम क्षेत्रात प्रवेश केल्यापासून मोठमोठ्या कंपन्यांची दुकानदारी बंद झाली. जिओसोबत स्पर्धा करताना, दिग्गज कंपन्यांना घाम फुटला..

वोडाफोन-आयडियाचे (Vodafone Idea) त्यात सर्वाधिक वाईट हाल झाले. तोटा वाढत गेल्याने या दोन कंपन्यांनी अखेर गळ्यात गळे घातले.. मात्र, दोन्ही कंपन्या एकत्र येऊनही त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही.. आता तर ते आणखी एका नव्या संकटात सापडले आहेत.

Advertisement

सध्या टेलिकॉम मार्केटमध्ये व्होडाफोन आयडियाला ‘टाटा’, ‘बाय बाय’ करुन अनेक युजर्स जिओ किंवा एअरटेल (Airtel) यांना जवळ करीत आहेत. त्यासाठी आपले नंबर पोर्ट (Portability) करीत आहेत.. त्यामुळे दिवसेंदिवस व्होडाफोन-आयडियाच्या युजर्सची संख्या झपाट्याने घसरलीय..

आपले युजर्स कायम राखण्यासाठी ‘वोडाफोन-आयडिया’ने नुकतीच एक धूर्त खेळी खेळली.. मात्र, त्यांची ही ट्रिक जिओच्या लक्षात आली.. त्यांनी लगेच याबाबत ‘ट्राय’कडे तक्रार केली.. नेमकं हे काय प्रकरण आहे, जाणून घेऊ या..

Advertisement

नेमकं काय घडलं..?
काही दिवसांपूर्वीच ‘एअरटेल’ व ‘व्होडाफोन आयडिया’ने त्यांच्या प्रीपेड प्लॅनच्या (Prepaid Plans) किंमतीत वाढ केली. त्यानंतर 1 डिसेंबरपासून ‘जिओ’नेही त्यांच्या प्लॅनमध्ये दरवाढ केली. मात्र, ही दरवाढ करतानाही ‘व्होडाफोन-आयडीया’ने एक चाल खेळली..

ती म्हणजे, व्होडाफोन-आयडियाने आपल्या 179 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनवर ‘एसएमएस’ सेवा ग्राहकांना दिलीच नाही. कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहकांना आता कोणालाही ‘एसएमएस’ पाठविता येणार नाही. ग्राहकांना रोखून धरण्यासाठी ‘व्होडाफोन’ने हा निर्णय घेतल्याचा आक्षेप जिओने घेतलाय.

Advertisement

आता तो कसा.. तर एखाद्याने व्होडाफोन-आयडियाचा 179 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा प्लॅन घेतला, तर तो ‘आऊटगोईंग एसएमएस’ पाठवू शकत नाही. त्यामुळे नंबर पोर्ट करण्यासाठीही ‘एसएमएस’ करता येणार नाही. हीच गोष्ट ‘जिओ’च्या लक्षात आलीय..

‘टेलिकॉम वॉचडॉग’चीही तक्रार
व्होडाफोन-आयडिया मोफत आऊटगोईंग मेसेजची (Outgoing Messages) सुविधा देत नसल्याने नंबर पोर्ट करण्यासाठी ग्राहकांना अधिक रकमेचा रिचार्ज करावा लागणार असल्याची तक्रार जिओने ट्राय (TRI)कडे तक्रार केली आहे. सध्या ट्रायकडून त्यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. फक्त जिओच नाही, तर ‘टेलिकॉम वॉचडॉग’ यांनीही ट्रायकडे व्होडाफोनची तक्रार केल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081

Advertisement