SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोदी सरकारची भन्नाट योजना..! मुलगी 18 वर्षांची होताच मिळणार 65 लाख रुपये..!

मोदी सरकारने विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. त्याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभही होत असल्याचे दिसते.. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोदी सरकारने अशीच एक योजना सुरु केली होती. तिचे नाव आहे.. ‘सुकन्या समृद्धी योजना..’
घरातील मुलगी शिकावी, हे शिक्षण घेताना तिला कोणत्याही आर्थिक अडचणीला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी मोदी सरकारने काही वर्षापूर्वी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ (Beti Bachao, Beti Padhao Yojana) ही योजना (Scheme) आणली होती.. 
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेअंतर्गत मोदी सरकारने ‘सुकन्या समृद्धी योजना’ (Sukanya Samruddhi Yojana) सुरु केली होती. मुलींनी शिकून स्वत:च्या पायावर उभं राहावं, या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली.. या योजनेअंतर्गत मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी पैशांची गुंतवणूक करता येते.

योजनेत सहभागी कसे व्हायचे..?
‘सुकन्या समृद्धी योजने’त रोज 416 रुपयांची बचत केल्यास मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तब्बल 65 लाख रुपये मिळू शकतात. मात्र, मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत हे खातं सुरु ठेवता येते. प्रत्येक कुटुंबातील 2 मुलींसाठी या योजनेचा लाभ घेता येतो..

सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम पोस्ट ऑफिस (Indian Post Office) किंवा कोणत्याही बँकेच्या अधिकृत शाखेत मुलीच्या नावाने खातं उघडावं लागतं. मुलीचा जन्म झाल्यानंतर 10 वर्षांच्या आत तुम्ही हे खाते उघडू शकता.

Advertisement

9 वर्षांत दुप्पट पैसे
या योजनेत 250 रुपये भरूनही मुलीच्या नावाने अकाऊंट उघडता येते. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर अगदी 9 वर्षे 4 महिन्यांतच या खात्यातील पैसै दुप्पट होतात. या योजने अंतर्गत एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपये खात्यात जमा करू शकता. शिवाय या योजनेमध्ये दर वर्षाला 7.6 टक्के व्याज मिळतं.

मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर ती स्वत:ही या खात्यातून आपले पैसे काढू शकते. त्यामुळे मुलीच्या भविष्याच्या दृष्टीने पाहिल्यास ही एक उत्तम योजना ठरणार आहे.

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081

Advertisement