उत्तर प्रदेश… लोकसंख्येचा विचार करता, देशातील सर्वांत मोठं राज्य.. शिवाय राजकीयदृष्ट्याही तितकंच महत्त्वाचं..! उत्तर प्रदेशमध्ये सध्या योगी सरकार आहे.. मात्र, 2022 च्या सुरुवातीला येथील विधानसभा निवडणुका होणार आहेत. अद्याप त्याच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत…
आगामी निवडणुकांच्या तोंडावर योगी सरकारने घोषणांचा सपाटा लावला आहे.. विरोधी पक्षांकडूनही नागरिकांना आतापासूनच विविध आश्वासने दिली जात आहेत..
उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी योगी आदित्यनाथ यांचे सरकार एका मोठ्या योजनेवर काम करीत असल्याचे समोर आलेय.. ते म्हणजे, राज्य सरकारी कर्मचारी नि वकिलांना फक्त एका रुपयात घर (Home scheme) देण्याचा योगी सरकारचा विचार आहे..
योगी सरकार (Yogi sarkar) गट ‘क’ नि ‘ड’ वर्गातील कर्मचारी व वकिलांना अनुदानावर ही घरे देणार आहे.. घर खरेदी करणाऱ्यांकडून जमिनीचे मूल्य म्हणून केवळ एक रुपया घेण्यात येणार आहे. मात्र, या योजनेत घर घेणाऱ्यांना किमान 10 वर्षांपर्यंत ते विकता येणार नाही.
कर्मचारी-वकिलांना मिळणार हक्काचे घर
सध्या उत्तर प्रदेशमध्ये गट ‘क’ आणि ‘ड’मधील वकिलांना सवलतीत घरे दिली जात नाहीत. शिवाय या वर्गातील लोकांचे उत्पन्नही फारसे नाही. त्यामुळे त्यांना घर खरेदी करण्यातही अडचणी येतात. त्यामुळे हे कर्मचारी व वकिलांचे स्वत:चे हक्काचे घर असावे, यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे..
उत्तर प्रदेशातील उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबत मसुदा तयार करण्यात आला. वरिष्ठ पातळीवर मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव मंत्रिमंडळ मंजूर करणार आहे. त्यानंतरच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले..
पात्रता-निकष नंतर ठरणार..
दरम्यान, अधिकाऱ्यांच्या बैठकीत घरे देण्याची प्रक्रिया कशी असेल, यावर एकमत झालेय. त्यासाठीच्या पात्रता व निकष नंतर ठरविले जाणार आहेत. त्याचबरोबर पात्र लोकांना घरे देण्यासाठी संबंधित विभाग नोडल असेल, असे सांगण्यात आले.
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081