SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारत-न्युझीलंडमधील दुसरी कसोटी संकटात..! टीम इंडियाचे मोठे नुकसान होणार…!

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कानपूर कसोटी सामना अनिर्णित अवस्थेत संपला. भारताला विजयाची मोठी संधी होती.. मात्र, न्युझीलंडच्या अखेरच्या जोडीने 50 चेंडू खेळून काढताना टीम इंडियाला यश मिळू दिले नाही.. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पीयनशीपसाठी दोन्ही संघांना विभागून प्रत्येकी 4 गुण देण्यात आले..

हाता-ताेंडाशी आलेला विजयाचा घास घेता न आल्याने टीम इंडियाला 4 गुणांवरच समाधान मानावे लागले.. आता मुंबईत उद्यापासून (ता. 3 डिसेंबर) दुसरी टेस्ट सुरु होत आहे. ही टेस्ट जिंकून पूर्ण गुण पदरात पाडून घेण्याच्या विचारात टीम इंडिया असेल, तर थांबा.. कारण, या टेस्टवरही संकटाचे मळभ दाटले आहेत..

Advertisement

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 3 डिसेंबर 2021 पासून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळविला जाणार आहे. मात्र, त्याच वेळी क्रिकेट चाहत्यांसाठी दु:खद बातमी समोर आलीय.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचे धुमशान सुरु आहे.. पुढील दोन ते तीन दिवस हेच वातावरण कायम राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे..

Advertisement

पहिल्या दिवशीही पावसाचा अंदाज
सध्या मुंबईतही मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस सुरु आहे.. कसोटीच्या पहिल्याच दिवशी (शुक्रवारी) जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे भारत व न्यूझीलंडमधील दुसर्‍या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ रद्द होण्याची शक्यता आहे..

मुंबईत कालपासून (ता. 1 डिसेंबर) सुरु असलेल्या पावसामुळे दोन्ही संघांना त्यांचे सराव सत्रही रद्द करावे लागले होते. आजही पावसाची रिमझिम सुरु असल्याने मैदान ओलं होतं. त्यामुळे भारतीय संघासाठी बांद्रा कुर्ला कॅम्पस मैदानात इनडोअर ट्रेनिंगची सोय करण्यात आली होती.

Advertisement

वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर जास्त गवत नसल्याने फिरकी गोलंदाजांना मदत होण्याची आशा आहे.. ढगाळ हवामानामुळे वानखेडेची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल असेल, असे बोलले जाते. त्यामुळे फिरकीसह वेगवान गोलंदाजांनाही ती मदत करण्याची अपेक्षा आहे.

संततधार पावसामुळे दोन दिवसांपासून खेळपट्टी झाकून ठेवली आहे. त्यामुळे पृष्ठभागाखाली भरपूर आर्द्रता राहणार आहे. खेळपट्टीवर अतिरिक्त ओलावा असल्याने वेगवान गोलंदाजांना नक्कीच मदत मिळेल. परंतु अशा विकेटमुळे फिरकीपटूंनाही मदत मिळू शकते..

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081

Advertisement