SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

😱 ब्रेकिंग: आता नोकरी सोडणेही महागणार! तुम्हीही नोकरी करताय? मग वाचा..

👨🏻‍💼 देशातील प्राप्तिकर विभागाच्या ऑथोरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंगने (Authority for Advance Ruling) सांगितलं की, प्राप्तिकर विभागाच्या आदेशानुसार, नोटीस पिरियडमध्ये कर्मचाऱ्याने काम केल्यावर कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार, ग्रुप इन्शुरन्स पॉलिसीसाठी कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त प्रिमियम घेण्यासाठी आणि त्यांचे फोन बिल भरण्यावर आता कंपनीला जीएसटी (GST) भरावा लागणार आहे.

📜 आदेशात काय?

Advertisement

▪️ प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Department) आदेशानुसार, जर कर्मचारी नोकरी सोडणार असेल, तर कर्मचारी नोटिस पीरियड पूर्ण करताना संबंधित कंपनी त्या कर्मचाऱ्यास प्रत्यक्षात एक सेवा पुरवत असल्याचं म्हटलं आहे. याचमुळे कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या या सेवेवर जीएसटी कर (GST) आकारणी करायला हवी, असं सांगितलंय.

▪️ माहीतीनुसार, जीएसटीच्या नियमांनुसार जीएसटी कर अशा प्रत्येक गोष्टीवर किंवा सेवेवर लागू होतो जिथे ती क्रिया ‘सेवा’ स्वरूपात दिली/घेतली जाते. एखाद्या कर्मचाऱ्याला तो ज्या कंपनीत काम करतो आहे, ती कंपनी सोडताना सर्वसाधारणपणे एक महिन्याचा नोटीस पिरियड असतो.

Advertisement

▪️ कंपनी नोटीस पिरियडमध्येही कर्मचाऱ्याला पगार देत असते, परंतु ऑथोरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंगनुसार कर्मचाऱ्याच्या या वेतनावर कंपनीला आता जीएसटी कर भरावा लागणार आहे. आदेशानुसार, या सेवेवरील जीएसटी कर हा कंपनीने भरायचा आहे, पण अनेक कंपन्या हा जीएसटी आपल्या कर्मचाऱ्यांकडूनच वसूल (GST on Notice Period) करण्याची शक्यता आहे. आता कंपनी हा अधिकचा भार आपल्या डोक्यावर घेते की कर्मचाऱ्यांवर टाकणार हे बघणे महत्वाचे ठरेल.

📍 इन्शुरन्स पॉलिसी आणि बिलांवरही द्यावा लागणार जीएसटी

Advertisement

एखाद्या कंपनीने नोटीस पिरियडमध्ये वेतनाबरोबरच ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी (Group Insurance Policy) कर्मचाऱ्यासाठी घेतली असेल, तसेच त्याच्या प्रीमियमचा (Premium) काही टक्के हिस्सा जर संबंधित कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांकडून घेतेय तर त्या अतिरिक्त प्रिमयमवरदेखील कंपनीला जीएसटी भरावा लागणार आहे. मोबाईल बिलावर आधीपासूनच जीएसटी कर द्यावा लागतो. जर कंपनीने त्या कर्मचाऱ्याचे मोबाईल बील भरत असेल तर त्यावरदेखील कंपनीला जीएसटी कर द्यावा लागणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081

Advertisement