देशातील कोविशील्ड लस कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी किती प्रभावी आहे, हे आगामी 2-3 आठवड्यांत कळेल, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली आहे. भविष्यात बूस्टर डोस लागू करण्याची कोणतीही योजना नसल्याचे सरकारने सध्यातरी स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले अदर पुनावाला…..?
कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ‘ओमिक्रॉन’ किती गंभीर आहे हे सध्या तरी सांगता येणार नाही. पण, याकरता बूस्टर डोसचा विचार केला जाऊ शकतो. आता, याआधी राज्यातील लोकांना सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्याकडे लक्ष द्यायला हवं, म्हणजे लसीकरण पूर्ण होईल, असं अदर पुनावाला म्हणाले.
कोरोनाच्या डेल्टा नावाच्या प्रकारातही कोविशील्ड लस विषाणूचा सामना करण्यासाठी प्रभावी असल्याचे दिसून आले. याशिवाय कोविशिल्ड (Covishield) लसीची परिणामकारकता खूप जास्त आहे आणि लक्षणीयरीत्या रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता आणि मृत्यूची शक्यता कमी करते असं निरीक्षण लॅन्सेटच्या अभ्यासात दिसून आलं होतं.
ओमिक्रॉनवर कोविशील्ड लसीच्या परिणामाबद्दल अभ्यास सुरू असून याच्या परिणामकारकतेबाबत काही आठवडे वाट पहावी लागेल. Omicron बद्दल अधिक माहिती उपलब्ध झाल्यानंतर दोन आठवड्यांनी या लस निर्मिताचा विचार केला जाईल, असं ते म्हणाले.
सध्या आमच्याकडे लाखो डोस स्टॉकमध्ये आहेत. आम्ही भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी काही कोटी डोस आरक्षित केले आहेत. सरकारने जर बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला, तर आम्ही लसींचा योग्य तो पुरवठा करण्यास तयार आहोत, जे त्याच किंमतीत दिले जातील. सध्या प्राधान्याने कोरोना लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे, असे अदर पूनावाला (Adar Poonawala) म्हणाले.
दरम्यान, ऑक्सफर्डचे शास्त्रज्ञ संशोधन करत असून त्यांच्या निष्कर्षांवर आधारित एक नवीन लस आम्ही आणू शकतो, जी येत्या सहा महिन्यांत बूस्टर डोस म्हणून सादर केली जाऊ शकते. परंतु बूस्टर डोस देण्यापूर्वी लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाला देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या आम्ही दर महिन्याला 250 दशलक्ष लसीचे डोस तयार करत असल्याचे सांगत आगामी काळात भारतीय लस उद्योगाला कच्च्या मालासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागणार नसल्याचेही ते म्हणाले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081