SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ईलेक्ट्रिक स्कूटरला ‘ही’ ई-सायकल देणार टक्कर, एका चार्जिंगमध्ये 100 किलोमीटर धावणार..!

सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे नागरिकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे.. त्यानुसार विविध कंपन्या ई-स्कूटर, बाईकच नव्हे, तर अगदी इलेक्ट्रिक कारचे उत्पादन करु लागल्या आहेत. त्याच बरोबर आता ई-सायकलला ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसत आहे..

कोरोना महामारीमुळे आरोग्याकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन बदलला आहे.. अनेक जण आता व्यायामासाठी ठराविक वेळ राखून ठेवत आहेत. त्यात जाॅंगिगबरोबरच सायकलींगकडे नागरिक वळले आहेत. मोठ्या प्रमाणात सायकल चालवण्याचा छंद जोपासला जात आहे..

Advertisement

नागरिकांचा कल लक्षात घेऊन इलेक्ट्रिक वाहन कंपनी ‘नेक्सझू मोबिलिटी'(Nexzu Mobility)ने आपली ‘रोडलार्क’ (Roadlark) इलेक्ट्रिक सायकल भारतीय बाजारात आणली आहे…

‘रोडलार्क’ सायकलची वैशिष्ट्ये
– सिंगल चार्जिंगवर सुमारे 100 किलोमीटर रेंज देत असल्याचा कंपनीचा दावा.
– आकर्षक लूक, जबरदस्त बॅटरी पॅक आणि जबरदस्त मोटर.
– दोन लिथियम आयकॉन बॅटरीचा प्रयोग. एक सायकलच्या फ्रेममध्ये, तर दुसरी चालकाच्या सीटखाली.
– एक्सटर्नल बॅटरी पॅकची क्षमता ८.७ एएच आहे. सायकलवरून काढता येऊ शकते.
– फ्रेममध्ये ५.२ एएच क्षमतेची बॅटरी.

Advertisement

– ३६ वॅट क्षमतेचे ब्रशलेस डीसी इलेक्ट्रिक मोटर (BLDC).
– दोन ड्रायव्हिंग मोड्स. ज्यात Pedlec मोड मध्ये हे सायकल १०० किलोमीटर आणि Throttle मोड मध्ये ७५ किलो मीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते.
– बॅटरी चार्ज होण्यासाठी फक्त ३ ते ४ तास लागतात.
– सायकलचा टॉप स्पीड २५ किलोमीटर प्रति तास.

– फ्लॅट हँडलबार आणि डिजिटल डिस्प्ले आहे. डिस्प्लेमध्ये रायडिंग स्पीड, चार्जिंग, बॅटरी परसेंटेजची माहिती मिळते. शिवाय एलईडी हेडलॅम्प आहेत.
– सायकल एकूण चार रंगात उपलब्ध. (ब्लू, ब्लॅक, रेड आणि सिल्वर कलर)

Advertisement

किंमत – ४२ हजार रुपये
(ग्राहक कंपनीच्या अधिकृत डिलरशीपकडून, तसेच वेबसाइटवरून थेट खरेदी करू शकतात.)

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081

Advertisement