SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एकावर दोन फ्री शाही भोजन थाळीच्या जाहीरातीला भुलला.. शेतकऱ्याला 300 रुपयांची थाळी लाखाला पडली..!

या जगात फुकट काहीच मिळत नाही.. हे बऱ्याच जणांना कळतं, पण वळत नाही.. कोणीतरी काहीतरी आमिष दाखवते नि त्याला चांगले चांगले लोक बळी पडतात.. अशा भामट्यांच्या जाळ्यात अडकतात.. नि लाखोंना गंडले जातात…

असाच काहीसा प्रकार औरंगाबादमध्ये घडला.. एकावर दोन भोजन थाळी फुकट मिळत असल्याच्या जाहीरातीला एक शेतकरी भुलला नि तब्बल लाखभर रुपयांना लूटला (crime news) गेला.. नेमका हा काय प्रकार होता, तो कसा घडला, चला तर जाणून घेऊ या..

Advertisement

नेमकं काय घडलं..
औरंगाबादमधील एका भामट्याने फेसबूकवर एक जाहीरात दिली होती… ‘एका शाही भोजन थाळीवर दोन थाळी फ्री…’ अशी ऑफर देण्यात आली होती.. अवघ्या 300 रुपयांत 3 शाही भोजन थाळी मिळणार होत्या.. ऑर्डर करण्यासाठी या भामट्याने जाहिरातीखाली मोबाईल क्रमांकही दिला होता..

फेसबुकवरील शाही भोजन थाळीच्या ‘बाय वन गेट टू फ्री..’ जाहिरातीला भुलून बाळासाहेब ठोंबरे नावाच्या शेतकऱ्याने बुकिंगसाठी दिलेल्या क्रमांकावर फोन केला.. त्यावर केवळ ऑनलाइन बुकिंग केले जात असल्याचे समोरुन सांगण्यात आले..

Advertisement

समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून ठोंबरे यांनी ऑनलाईन बुकिंगसाठी आधी स्वतःची, नंतर क्रेडिट कार्डची सगळी माहिती सांगून टाकली.. तसेच मोबाइलवर आलेला ‘ओटीपी’ क्रमांकही सांगितला.

पहिल्यांदा तांत्रिक कारणामुळे बुकिंग झाले नसल्याचे सांगून दुसऱ्यांदा पुन्हा ‘ओटीपी’ मागितला.. शाही भोजन थाळी राहिली बाजूला ठोंबरे यांच्या खात्यातून 99 हजार 890 रुपये एका झटक्यात गायब झाले. 300 रुपयांची थाळी लाखभर रुपयांना पडली..

Advertisement

याबाबत ठोंबरे यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, ही जाहीरात आजही फेसबुकवर पाहायला मिळते. आणखी किती जणांना त्याने लूटले असेल, याची माहिती मिळालेली नाही..

भोज थाळी मालकाचीही तक्रार
दरम्यान, ज्यांच्या नावाने या भामट्याने जाहीरात केली होती, त्या औरंगाबादेतील भोज थाळीच्या मालकाला काही दिवसांपूर्वी दोन लोक रोज येऊन भेटत असल्याची माहिती मिळाली. त्यांनीही या प्रकाराबाबत सायबर क्राईमकडे तक्रार केली होती. त्यानंतर काही काळ हा भामटा शांत राहिला, मात्र आता तो पुन्हा सक्रिय झाला आहे..

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081

Advertisement