मोबाईल रिचार्जसाठी हे आहेत स्वस्तात मस्त प्लॅन्स, 200 रुपयांपेक्षाही कमी किंमतीचे प्लॅन्स जाणून घेण्यासाठी वाचा..
महागाईने सर्वसामान्य नागरिक हैराण झालेला असतानाच, मागील काही दिवसांत मोबाईलच्या सर्व प्रीपेड प्लॅनच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
सुरुवातीला एअरटेल (Airtel), त्यानंतर वोडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) व नंतर रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती वाढविण्याची घोषणा केली. त्यानंतर लगेच त्याची अंमलबजावणीही सुरु करण्यात आली…
मात्र, आजही नागरिकांसाठी स्वस्तात मस्त, खिशाला परवडणारे रिचार्ज प्लॅन्स (Recharge plans) उपलब्ध आहेत.. चला तर या कंपन्यांचे 200 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅन्सबद्दल जाणून घेऊ या…
एअरटेल
179 रुपयांचा प्लॅन
– एअरटेलच्या १४९ रुपयांच्या प्लॅन आता १७९ रुपयांना झाला.
– अमर्यादित कॉलिंग, रोज १०० एसएमएस नि २८ दिवसांच्या वैधतेसह २ जीबी डेटा.
– ग्राहकांना अमेझाॅन प्राईम व्हिडीओ मोबाईल व्हर्जन (Amazon Prime Video mobile version), विंक (Wynk) म्युझिक नि अनलिमिटेड हॅलो ट्यूनचे सबस्क्रिप्शन.
१५५ रूपयांचा प्लॅन
– ग्राहकांना २४ दिवसांसाठी १ जीबी डेटा. सोबत मोफत अनलिमिटेड कॉलिंग, ३०० एसएमएसची सुविधा
– अमेझाॅन प्राईम व्हिडीओ मोबाईल व्हर्जन, विंक, म्युझिक नि अनलिमिटेड हॅलो ट्यूनचे सबस्क्रिप्शन.
वोडाफोन-आयडिया
१७९ रूपयांचा प्लॅन
– ग्राहकांना २८ दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, २ जीबी डेटा, ३०० एसएमएस.
– या प्लॅनमध्ये बिंज ऑल नाईट, विकेंड डेटा रोलओव्हरसारख्या सुविधा मिळत नाहीत.
१९९ रूपयांचा प्लॅन
– प्लॅनला १८ दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० एसएमएस.
– शिवाय वी मुव्हीज् अॅण्ड टीव्ही (Vi Movies & TV)चा अॅक्सेस
रिलायन्स जिओ
१५५ रुपयांचा प्लॅन
– ग्राहकांना २ जीबी डेटा, ३०० एसएमएस, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग.
– जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज, जिओ सिक्युरिटी यांसह अनेक Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन.
१७९ रुपयांचा प्लॅन
– रोज १ जीबी हायस्पीड डेटा, लिमिट संपल्यानंतर कमी स्पीड.
– प्लॅनची वैधता २४ दिवस, अनलिमिटेड कॉलिंगसह मोफत जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शन.
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉7030306081