SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर, आता ‘हे’ नियम पाळावे लागणार…

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Diwas) राज्य शासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या महिन्यात 6 डिसेंबर 2021 रोजी मुंबईमधील दादर येथील चैत्यभूमीवर कोणताही जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यास राज्य शासनाने आता मनाई केली आहे.
महापरिनिर्वाण दिन हा डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस असतो. पण सध्या ओमिक्रॉन विषाणूच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर यंदा महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घरूनच अभिवादन करावं अशा काही मार्गदर्शक सूचना (guidelines for Mahaparinirvan Diwas 2021) प्रशासनाकडून जारी करण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीत काय?
▪️ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा दिनांक 06 डिसेंबर रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम Covid-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण खबरदारी घेवून साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता किंवा गर्दी न करता आयोजित करण्याचं राज्य शासनानं आवाहन केलं आहे.
▪️ कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे आधीच उपाययोजना म्हणून परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक क्रमांक ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे अचूक, तंतोतंत पालन करावेत.
▪️ ओमिक्रॉन (Omicron Variant) या कोरोना विषाणुच्या प्रजातीमुळे कोविड संसर्गाचा वाढलेल्या धोक्याविषयी खबरदारी म्हणून महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक आहे .
▪️ राज्य सरकारतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर, मुंबई येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायांनी चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे न येता घरी राहूनच डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.
▪️ महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमासाठी जे व्यक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणार असतील, त्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस (Vaccination) घेतलेले असावेत.
▪️ कोरोनाविषयक नियम पाळता आणि काळजी घेता कार्यक्रमाच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढु नये यासाठी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
▪️ महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी / शिवाजी पार्क मैदान परिसरात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ / पुस्तके यांचे स्टॉल लावण्यात येवू नयेत . तसेच सदर परिसरात कोणत्याही व्यक्तींनी कोणत्याही प्रकारच्या सभा, धरणे, निदर्शने, आंदोलने व मोर्चे काढू नयेत.
▪️ महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम हा राज्यातील सर्व जिल्हे तालुके यामध्येही आयोजित करण्यात येत असल्याने त्यासंदर्भात स्थानिक / जिल्हा प्रशासनाने कोविड 19 च्या स्थानिक परिस्थितीचा विचार करुन (कोरोनाचा प्रादुर्भाव किती आहे, हे पाहून) आवश्यक त्या उपाययोजना करणं गरजेचं राहील व त्यासंबंधीचे तसे त्यांनी आदेशही काढावेत.
▪️ ‘ओमिक्रॉन’ या नव्या विषाणू प्रजातीचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन विभाग, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकिय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन सर्व नागरिकांनी करावे लागणार आहे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष महापरिनिर्वाण दिन अभिवादन सुरु होण्याच्या दरम्यान शासन व स्थानिक प्रशासन स्तरावरुन आणखी काही सूचना, मार्गदर्शक सूचना या नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील जशास तसे पालन करावेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081