SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पेन्शन मिळवण्यासाठी केवळ तुमचा चेहराच पुरेसा…! मोदी सरकारने सुरु केला अनोखा उपक्रम..

पेन्शन हवी, तर दरवर्षी सगळ्या पेन्शनधारकांना हयातीचा दाखला, अर्थाच लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate) सादर करावेच लागते. दाखल्यासाठी वृद्ध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे हाल होत असत.. 2014 मध्ये केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर मोदी सरकारने डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सोय केली..

कामगार, जन तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाने डिजिटल जीवन प्रमाणपत्र सुविधा सुरु केल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मोठी अडचण दूर झाली.. त्यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी (Pension Holders) आता पुन्हा एकदा दिलासादायक बातमी आहे..

Advertisement

मोदी सरकारने (Modi sarkar) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळविण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आणखी एक सोय केली आहे… त्याचे नाव आहे, ‘यूनिक फेस रेकग्नेशन टेक्नॉलॉजी..!

असा होणार फायदा..!
केंद्रिय कामगार राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी (ता. 29) ‘यूनिक फेस रेकग्नेशन टेक्नॉलॉजी (Unique Face Recognition Technology)चा प्रारंभ केला. जीवन प्रमाणपत्रासाठी या सुविधेचा लाभ होणार आहे. चेहरा ओळखणाऱ्या या सुविधेमुळे पेन्शनधारक हयात असल्याची पुष्टी होणार आहे..

Advertisement

पेन्शनधारकांसाठी ‘डिजिटल लाईफ सर्टिफिकेट’ सादर करण्याचा निर्णय घेतला होता. आता ‘युनिक फेस रेकग्नीशन टॅक्नॉलॉजी’मुळे पेन्शनधारकांना आणखी मदत होणार आहे. पेन्शनधारकांच्या गरजा नि त्यांचे जीवन जगणे सोपे करण्यासाठी केंद्र सरकार संवेदनशील असल्याचे राज्यमंत्री सिंह यांनी सांगितले.

किती पेन्शनधारकांना लाभ होणार..?
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जीवन प्रमाणपत्र देण्यासाठी ‘फेस रेकग्नेशन टेक्नॉलॉजी’ एक ऐतिहासिक सुधारणा ठरणार आहे. त्यातून केंद्रीय 68 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.. शिवाय ‘ईपीएफओ’ आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही लाभ होणार असल्याचे ते म्हणाले.

Advertisement

पेन्शनधारकांसाठी ही अनोखी सुविधा तयार केल्याबद्दल मंत्री सिंह यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, डिपार्टमेंट ऑफ पेन्शन अँड पेन्शनर्स वेल्फेयर यांना धन्यवाद दिले..

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081

Advertisement