SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021

मेष (Aries) : गृहिणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. आज नशीबाची पूर्ण साथ मिळेल. अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील.

वृषभ (Taurus) : कामाच्या ठिकाणी चांगला वेळ घालवाल. खाण्या-पिण्याची रेलचेल होईल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल.

मिथुन (Gemini): केवळ कामावर लक्ष केंद्रीत करावे. घरी पाहुण्यांच्या येण्याने आनंदाच वातावरण असणार आहे. मनातील बदलांकडे लक्ष द्या.

कर्क (Cancer) : कामाच्या ठिकाणी स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. सामाजिक कामात सहभागी होता येईल. आज गुरूंच्या आणि मोठ्या व्यक्तींच्या प्रती कृतज्ञतेची भावना असेल.

सिंह (Leo) : पत्नी आणि संततीविषयी चिंता वाटेल. त्यामुळे मनात उद्विग्नता येईल. हेतु मनात धरून कामे कराल. महिलांनी शांत राहावे.

कन्या (Virgo): . आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो. तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. आज शत्रूंना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका.

तूळ (Libra) : आनंद द्विगुणित होईल.संपत्तीच्या खरेदीत लाभ होईल. मात करण्याचा प्रयत्न करा. मुलांना आज अभ्यास कंटाळवाणा वाटेल.

वृश्चिक (Scorpio) : समोरील संधी सोडू नका. स्वत:चा फायदा लक्षात घेऊन वागाल. मित्रांशी सलोख्याने वागावे. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका.

धनु (Sagittarius) : निराशाजनक विचार करू नका. नवीन विचारांनी त्रस्त राहाल. ठोस निर्णयाची गरज आहे. तुम्ही तुमचे प्रत्येक कार्य चपळतेने सहजपणे पूर्ण कराल.

मकर (Capricorn) : जमिनीतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे तुमची प्रकृती ताजीतवानी होईल. भावंडांमध्ये प्रेमभाव राहील.

कुंभ (Aquarius) : विद्यार्थ्यांना परीक्षा-स्पर्धेत यश मिळेल. नोकरीत कोणाच्या मदतीमुळे नवीन काही शिकण्याची संधी मिळेल, मनात आनंद दिसून येईल.

मीन (Pisces) : जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यशस्वी व्हाल. आजच्या विचारांना प्राधान्य दिलेत तरी बरेच समाधान आणि आराम लाभेल.

Advertisement