SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आयपीएल रिटेशन : दिग्गज खेळाडूंना दाखविला बाहेरचा रस्ता, कोणत्या संघाकडे कोणते खेळाडू राहिले..?

आयपीएल 2022 साठी सर्व 8 संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची घोषणा काल (मंगळवारी) रात्री केली.. त्यात अनेक फ्रेंचायझींनी संघातील दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवल्याचे दिसत आहे.

आगामी आयपीएलमध्ये अहमदाबाद व लखनऊ या दोन नवीन संघांचा समावेश झाला आहे. मेगा ऑक्शनपूर्वी या दोन्ही संघांना तीन खेळाडू घेता येणार आहेत. त्यासाठी 25 डिसेंबरपर्यंत मुदत आहे.

Advertisement

प्रत्येक जुन्या फ्रेंचायझीला जास्तीत जास्त 4 खेळाडू कायम ठेवता येणार होते. त्यात जास्तीत जास्त 3 भारतीय व एक विदेशी किंवा दोन भारतीय व दोन परदेशी खेळाडू संघात कायम ठेवता येणार होते.

मुंबई इंडियन्स
आयपीएलमध्ये सर्वाधिक 5 वेळा ट्रॉफी जिंकलेल्या मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमराह (12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी) व कायरन पोलार्ड (6 कोटी) यांच्यावर विश्वास दाखवला. हार्दिक पांड्या व कृणाल पांड्या यांना मुंबईने बाहेरचा रस्ता दाखवला. ईशान किशनलाही रिटेन केलं नाही.

Advertisement

चेन्नई सुपर किंग्ज
सीएसकेने रवींद्र जडेजा (16 कोटी), एम.एस. धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी) व ऋतुराज गायकवाड (6 कोटी) यांना कायम ठेवलं. धोनीने या रिटेनशनमध्ये मोठं मन दाखवलं. चेन्नईने रिटेन केलेला धोनी हा दुसरा खेळाडू होता. त्यामुळे त्याला कमी किंमत मिळाली.

चेन्नईने या चार खेळाडूंवर 42 कोटी रुपये खर्च केल्याने आता लिलावात त्यांच्याकडे खर्च करण्यासाठी 48 कोटी रुपये शिल्लक आहेत.

Advertisement

सनरायजर्स हैदराबाद
हैदराबादने केन विलियमसन (15 कोटी), अब्दुल समद (4 कोटी) आणि उमरान मलिक (4 कोटी) यांना रिटेन केलं. डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे, राशिद खान, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार या दिग्गजांना हैदराबादने बाहेर केले. तीन खेळाडूंवर 33 कोटी रुपये खर्च केले असून, 68 कोटी शिल्लक आहेत.

पंजाब किंग्स
पंजाबने मयंक अग्रवाल (12 कोटी) व अर्शदीप सिंग (4 कोटी) यांनाच कायम ठेवले. कॅप्टन के.एल. राहुल याच्यासह क्रिस गेल, निकोलस पूरन, तसेच शाहरुख खानही याला रिटेन न करण्याचा निर्णय पंजाब किंग्सने घेतला.

Advertisement

दिल्ली कॅपिटल्स
दिल्लीने ऋषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.5 कोटी) व एनरिच नॉर्किया (6.5 कोटी) यांना रिटेन केलं. श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, कागिसो रबाडा, शिखर धवन यांना दिल्लीने बाहेरचा रस्ता दाखवला. दिल्लीने 39 कोटी रुपये खर्च केले असून, 47.5 कोटी रुपये वापरता येतील.

कोलकाता नाईट रायडर्स
केकेआरने आंद्रे रसेल (12 कोटी), व्यंकटेश अय्यर (8 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी) आणि सुनिल नारायण (6 कोटी) यांना कायम ठेवलं. कर्णधार इयन मॉर्गन, दिनेश कार्तिक, शुभमन गिल यांनाही स्थान दिलं नाही. केकेआरने 42 कोटी रुपये खर्च केले, 48 कोटी रुपये वापरता येतील.

Advertisement

राजस्थान रॉयल्स
राजस्थानने संजू सॅमसन (14 कोटी), जोस बटलर (10 कोटी), यशस्वी जयस्वाल (4 कोटी) यांनी रिटेन केलं. या तीन खेळाडूंवर 28 कोटी रुपये खर्च केले असून, लिलावासाठी 62 कोटी रुपये शिल्लक आहेत. बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, सर्वात महागडा ठरलेला क्रिस मॉरिस यांना राजस्थानने संघाबाहेर केलं.

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर
आरसीबीने विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी) आणि मोहम्मद सिराज (7 कोटी) यांना रिटेन केले. देवदत्त पडिक्कल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर नि हर्षल पटेल यालाही बाहेरचा रस्ता दाखविला.

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081

Advertisement