ओमीक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे दक्षिण आफ्रिका आणि युरोपमध्ये ओमीक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला आहे. ओमिक्रॉनचं संशोधन करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांना ओमिक्रॉन व्हेरियंटची पुष्टी झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनंही चिंता व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रीय संचारी रोग संस्थान (एनआयसीडी) च्या वतीने या ओमिक्रॉन व्हेरियंटसंबंधी माहिती देण्यात आली आहे.
ओमिक्रॉन व्हेरियंटची लक्षणे :
ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण एखाद्या व्यक्तीला झाली तर त्या व्यक्तीमध्ये फारशी काही वेगळी लक्षणे (symptoms of Omicron) दिसून येत नाहीत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ओमिक्रॉन विषाणू खूप लवकर त्याचे स्वरूप बदलतो. एनआयसीडीने दिलेल्या माहितीनुसार सांगितले जात आहे की, ओमिक्रॉननं बाधित व्यक्तीमध्ये फारशी वेगळी लक्षणे दिसत नाहीत.
दक्षिण आफ्रिकेतील मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष एंजेलीक कोएट्जी यांनी सांगितलं की, “या आजाराचे सौम्य लक्षणं दिसत आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यास त्या रुग्णाला अत्यंत थकवा, घसा खवखवणे, स्नायू दुखणे, थकवा जाणवणे, अथवा दोन दिवस आजारी राहण्यासारखी लक्षणं दिसतात.
आतापर्यंत ओमिक्रॉनची लागण झालेले आढळून आलेले बहुतेक रुग्ण 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, असेही त्यांनी म्हटलं. आतापर्यंत या व्हेरिएंटमुळे वास न येणं यासारखी समस्या कुणामध्येही जाणवली नाही. कोरोना संक्रमित व्यक्तींमध्ये कमी-अधिक प्रमाणात कफ होण्याची शक्यता आहे.
ओमिक्रॉनने संक्रमित झालेले काही रुग्ण घरातच उपचार घेत आहेत. पण हे सुरुवातीच्या स्टेजमध्ये उपायकारक ठरू शकतं; म्हणून कोरोनाविषयक आवश्यक ती सर्व प्राथमिक काळजी घेऊन, चाचणी करून डॉक्टरांकडून योग्य उपचार घ्यावेत. नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर भारतासोबत इतर अनेक देशही सतर्क झाले आहेत. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेहून येणाऱ्या प्रवाशांना क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी चाचणी करणं बंधनकारक असल्याचे सांगण्यात येत आहे.
डेल्टा आणि कोरोनाच्या इतर दुसऱ्या प्रकारांपेक्षा ‘ओमिक्रॉन’ अधिक संक्रमणक्षम (एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत सहज पसरते) आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या ते फक्त आरटी-पीसीआर चाचणीद्वारे शोधले जाऊ शकते, अशी माहीती आहे. कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ प्रकाराचा कोविड-19 लसीवर काय परिणाम होईल हे शोधण्यासाठी WHO (World Health organization) सध्या काम करत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7066317507