मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना जीव गमवाव्या लागलेल्या नागरिकांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रूपयांची मदत करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही मदत केली जाणार आहे. एकूण 34 कुटुंबांसाठी मदतीची रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यात मराठा समाजाने प्रचंड मोठ्या संख्येने मोर्च काढले होते.. सध्या हा लढा न्यायालयात सुरु आहे.. मात्र, मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) लढा देताना काहींना आपला जीव गमवावा लागला होता. त्यांच्या वारसांना मदत करण्याची मागणी होत होती..
फडणवीस सरकारने आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रूपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ 15 कुटुंबांनाच व तेही प्रत्येकी 5 लाख रूपयांची मदत करण्यात आली होती.
फडणवीस सरकारने दिलेले आश्वासन महाविकास आघाडी सरकारचे पूर्ण करील. या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 10 लाख रूपये देण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले होते.
ठाकरे सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असताना, सरकारने आपली वचनपूर्ती केली आहे.. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात आले आहे.. तसचे यापूर्वी 5 लाख रूपये मिळालेल्या 15 वारसांना प्रत्येकी आणखी 5 लाख रूपये या निधीतून दिले जाणार आहेत.
मृतांच्या नातलगांना दिलासा..
राज्य सरकारने एकूण 2 कोटी 65 लाख रूपयांचा मदतनिधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मृतांच्या नातलगांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे..
ठाकरे सरकारने 34 कुटुंबांना ही मदत केली आहे. त्यात औरंगाबादमधील 6, जालना 3, बीड 11, उस्मानाबाद 2, नांदेड 2, लातूर 4, पुणे 3, तर अहमदनगर, सोलापूर व परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले..
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7030306081