गेल्या आठवड्यात बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथील ज्योतिर्लिंग, तसेच अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे मंदिर उडवून देण्याचे धमकी पत्रे आली होती. राज्यातील दोन मोठ्या मंदिरांना अशा प्रकारे धमकीची पत्रे आल्याने मंदिर प्रशासनासह पोलिस प्रशासनही चांगलेच हादरले…
’50 लाख रुपयांची खंडणी द्या, अन्यथा ‘आरडीएक्स’ने मंदिर उडवून देऊ..’ अशी धमकी पत्रातून देण्यात आली होती.. नांदेडमधील विष्णुपुरी येथील रहिवाशी रतनसिंग दक्खने, व्यंकट गुरपत मठपती व प्रभाकर पुंड यांच्या नावांनी हे पत्र पाठविण्यात आले होते..
अखेर या प्रकरणाचा उलगडा करण्यात बीड पोलिसांना यश आले आहे.. विशेष म्हणजे, तपासातून जे समोर आले, ते पाहून पोलिसांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली.. फक्त या दोन मंदिरांनाच नाही, तर आतापर्यंत देशातील 100 पेक्षा जास्त मंदिरांना अशी धमकीपत्रे आरोपीने पाठविल्याचे समोर आले.
राज्यातील महत्वाच्या दोन मंदिरांना धमकीपत्रे आल्याने बीड पोलिसांनी हे प्रकरण सुरुवातीपासून गांभीर्याने घेतले.. पोलिस तपासात ही दोन्ही पत्रे एकाच व्यक्तीने लिहिल्याचे दिसत होते. कारण, दोन्ही पत्रांतील हस्ताक्षर सारखेच होते.. शिवाय मजकुरातही काही बदल नव्हता..
शिवाय ही दोन्ही पत्रे जेथून पाठविण्यात आली, त्याचा पत्ताही एकच होता. फक्त दोन्ही पत्रात वेगवेगळ्या लोकांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता…!
नेमकं प्रकरण काय…?
नांदेड येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकाने हा सगळा प्रताप केल्याचे तपासात समोर आलेय.. या मास्तरने उदगीर येथील त्याची जमीन विष्णुपुरी येथील रतनसिंग रामसिंग दक्खने यांना काही दिवसांपूर्वी विकली होती..
नंतरच्या काळात ही शेती व पैशाच्या कारणांवरुन हा मास्तर व दक्खने यांच्यात खटका उडाला.. दोघांमधील हा वाद न्यायालयात पोहचला.. अखेर या मास्तरने दक्खने यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला..
परिसरातील कोणाचाही मृत्यू झाला किंवा कोणी आत्महत्या केली, तरी दक्खने यांच्या नावाने या मास्तरने पत्रे पाठविण्यास सुरुवात केली. त्याचा नाहक त्रास दक्खने यांना होत होता. नंतर या मास्तरच्या सुपीक डोक्यातून मंदिरांना धमकीपत्रे आयडिया निघाली..
100 हून अधिक मंदिरांना पत्रे
देशातील 100 हून अधिक मंदिरांना दक्खने व इतर काही लोकांच्या नावाने या मास्तरने धमकीपत्रे पाठविली. तसेच नांदेड ग्रामीण पोलिस, इतवारा पोलिस, नांदेड पोलिस अधीक्षक कार्यालय, आयजी ऑफिस, नांदेड, मांडवी, किनवट पोलिस, परळी वैजनाथ मंदिर, अंबाजोगाई मंदिराला त्यानेच पत्र पाठविल्याचे स्पष्ट झाले.
एका छोट्याशा जमिनीच्या वादातून 2016 पासून त्याचे धमकी सत्र (पत्र) सुरू होते.. कोरोनामुळे मधल्या काळात मास्तर काहीसे शांत बसले.. मात्र, कोरोनाचा जोर ओसरताच मास्तरांनी पुन्हा एकदा धमकीपत्रांचा सपाटा सुरु केला.
दरम्यान, ही पत्रे मास्तराने पाठविल्याचे समोर आले असले, तरी पत्रातील अक्षर त्याचे नसल्याचा दावा त्याच्या शाळेने केलाय. त्यामुळे त्याने ही पत्रे कोणाकडून लिहून घेतली का, याचा तपास आता पोलिस करीत आहेत..
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7066317507