SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार, योजनेत तुमचं नाव आहे का, तपासा..

देशातील पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. पंतप्रधान किसान सन्मान निधीचे पैसे लवकरच त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर होणार आहेत. शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 15 डिसेंबरला दहावा हप्ता जमा होणार असल्याची माहीती आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Advertisement

📚 शाळा सुरु करण्याच्या निर्णयाबाबत आरोग्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य

🤔 नियमांबाबत जाणून घेण्यासाठी क्लिक करा 👉🏻 https://bit.ly/3E0mgBC

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शेतकऱ्यांच्या खात्यात दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपये जमा होतात. पीएम किसान योजनेअंतर्गत (Pm Kisan Scheme) शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत नऊ हप्त्याचे पैसे जमा करण्यात आले आहेत. केंद्र सरकार दहावा हप्ता 15 डिसेंबरच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करु शकते. तसेच जर शेतकऱ्यांना नवव्या हप्त्याचे पैसे मिळाले नसतील तर मग नवव्या व दहाव्या हप्त्याचे पैसे सोबतच 4000 हजार रुपये जमा होऊ शकतात.

Advertisement

पीएम किसान योजनेत तुमचं नाव आहे का ऑनलाईन तपासा..

▪️ पीएम किसानच्या वेबसाईटला भेट द्या, त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://pmkisan.gov.in भेट द्या.
▪️ आता होमपेजवर उजव्या बाजूला लगेच खाली Farmers Corner (फार्मर्स कॉर्नर) मध्ये अनेक पर्याय
दिसतील.
▪️ Farmers Corner मध्ये Beneficiaries List या पर्यायावर जा.
▪️ यासोबतच तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉक निवडा.
▪️ तसेच, लाभार्थ्यांची पूर्ण यादी आता तुमच्या समोर येईल. त्यात तुम्ही नाव पाहू शकता.

Advertisement

पीएम किसान योजनेत कोणता लाभ?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्राची योजना असून ही केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केंद्र सरकारने डिसेंबर 2018 साली केली आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देण्यात येतात. हे पैसे प्रत्येकी 2000 रुपये अशा तीन हप्त्यात शेतकऱ्याच्या खात्यावर हस्तांतरित केले जातात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7066317507

Advertisement