SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गॅस सबसिडी हवी असेल, तर लगेच करा हे महत्वाचे काम, आता किती रुपये सबसिडी मिळणार, वाचा..!

महागाईने त्रासलेल्या गृहिणींसाठी महत्वाची बातमी आहे.. मोदी सरकारने पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडरवरील सबसिडी (Lpg Gas Cylinder) देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना आता त्यांच्या खात्यात 79.26 रुपये सबसिडीच्या स्वरुपात पाठवले जाणार आहेत..

घरगुती गॅसवरील सबसिडी मिळण्यासाठी तातडीने एक महत्त्वाचे काम पूर्ण करावे लागणार आहे.. नाहीतर सबसिडीला मुकावे लागण्याची शक्यता आहे..

Advertisement

अनेक ग्राहकांना गॅस सबसिडी मिळत नाही, कारण तुमचा ‘एलपीजी आयडी’ तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेला नसतो. गॅस सबसिडी हवी असल्यास लवकरात लवकर हे काम पूर्ण करा. त्यासाठी जवळच्या डिस्ट्रिब्युटरशी संपर्क साधावा लागेल.

विक्रेत्याकडे तुम्ही तुमची समस्या सांगू शकता किंवा टोल फ्री नंबर 18002333555 वर कॉल करून देखील तक्रार दाखल करू शकता…

Advertisement

किती सबसिडी मिळणार..?
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरवरील अनुदानाचे पैसे थेट ग्राहकांच्या खात्यावर ट्रान्सफर केले जातात. आता एलपीजी गॅस ग्राहकांना 79.26 रुपये प्रति सिलिंडर सबसिडी दिली जाते.. काही ठिकाणी 158.52 रुपये, तर काही ठिकाणी 237.78 सबसिडी मिळत असल्याचे दिसते.

आता कुणाला मिळतेय सबसिडी..?
प्रत्येक राज्यात आता सबसिडीची रक्कम वेगवेगळी मिळते. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख किंवा त्याहून अधिक आहे, त्यांची सबसिडी बंद करण्यात आली आहे.. 10 लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न पती-पत्नीचे मिळून मोजले जाते.

Advertisement

सबसिडी मिळते की नाही, असे पाहा..
– सुरवातीला https://mylpg.in/ या साइटवर जाऊन ‘एलपीजी आयडी’ टाकावा..
– नंतर ‘ओएमसी एलपीजी’ (OMC LPG)च्या आधारावर तुम्हाला आवश्यक माहिती द्यावी लागेल.
– तुमचा 17 अंकी ‘एलपीजी आयडी’ टाकून मोबाईल नंबर नोंदवा. कॅप्चा कोड टाकून ‘प्रोसिड’वर (proceed)वर क्लिक करा.

– मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. नंतर तुमचा ई-मेल आयडी टाकून पासवर्ड तयार करा. तुम्हाला ई-मेलवर लिंक येईल. त्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
– आता mylpg.in खात्यावर लॉग इन करा नि पॉप-अप संदेशामध्ये तुमचा तपशील प्रविष्ट करा. तेथे सिलेंडर बुकिंग हिस्ट्री / सब्सिडी ट्रान्सफर हे पर्याय तपासून सबसिडीचे स्टेटस पाहू शकता.

Advertisement

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7066317507

Advertisement