आयपीएल 2022 च्या हंगामात अहमदाबाद व लखनऊ या नव्या संघाचा समावेश झाल्याने संघांची एकूण संख्या 10 वर गेली आहे.. त्यामुळे जानेवारी-2022च्या पहिल्या आठवड्यात मेगा लिलाव होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 30 नोव्हेंबरपर्यंत 8 संघांना काही खेळाडू रिटेन करता येणार आहे.. शिवाय दोन नव्या संघांना लिलावापूर्वी काही खेळाडू खरेदी करण्याची परवानगी दिली आहे.. त्यामुळे सध्या प्रत्येक संघ चाचपणी करीत आहे.
किती खेळाडू रिटेन करता येणार..?
प्रत्येक संघाला 4 खेळाडू रिटेन करता येणार आहेत. त्यात दोन पेक्षा जास्त विदेशी खेळाडू नसतील.. म्हणजे, 2 भारतीय 2 विदेशी, अथवा तीन भारतीय एक विदेशी खेळाडू रिटेन करता येणार आहे.
रिटेन करण्यात येणाऱ्या पहिल्या खेळाडूला 16 कोटी, दुसऱ्याला 12 कोटी, तिसऱ्यासाठी 8, तर चौथ्या खेळाडूला 6 कोटी रुपये दिले जाणार आहेत..
‘बीसीसआय’ने यंदा प्रत्येक संघाला लिलावात खेळाडू खरेदी करण्यासाठी 90 कोटी रुपये खर्च करण्याची मुभा दिली आहे. रिटेनमध्ये खेळाडू खरेदी केल्यास त्यातून रक्कम वजा होणार आहे..
कोणता संघ कोणत्या खेळाडूला रिटेन करणार..?
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड, इशान किशन / सूर्यकुमार यादव.
दिल्ली कॅपिट्लस – ऋषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, नॉर्त्जे
चेन्नई सुपरकिंग्ज – एम. एस. धोनी, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जाडेजा, मोईन अली / सॅम करन
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु – विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, यजुवेंद्र चहल, देवदत्त पडीकल/हर्षल पटेल
राजस्थान रॉयल – संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, चेतन सकारिया
पंजाब किंग्ज – एकाही खेळाडूला रिटेन करणार नाही.
कोलकाता नाईट रायडर्स – आंद्रे रसेल, सुनिल नारायण, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर.
सनरायजर्स हैदराबाद – केन विल्यमसन, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, अब्दुल समद.
लखनऊ, अहमदाबाद संघांचे काय..?
लिलावात उतरलेल्या खेळाडूंमधून लखनऊ व अहमदाबाद संघाला प्रत्येकी तीन खेळाडू खरेदी करता येणार आहेत. त्यात एक विदेशी व दोन भारतीय खेळाडू घेता येतील. त्यासाठी त्यांना 33 कोटीचे बजेट दिले आहे.
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7066317507