SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आयपीएलमधील नवीन अहमदाबाद टीम वादाच्या भोवऱ्यात, आयपीएल खेळण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित..!

आयपीएल-2022 मध्ये अहमदाबाद व लखनऊ, अशा दोन नव्या संघाची एन्ट्री झाली. आरपी संजीव गोयंका समूहाने लखनऊ संघाला 7,090 कोटी रुपयांमध्ये, तर सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबाद संघाला 5600 कोटी रुपयांना खरेदी केले..

दुबईमध्ये 25 ऑक्टोबरला झालेल्या लिलावातून हे दोन्ही संघ समोर आले.. मात्र, त्यानंतर काही वेळातच सीव्हीसी कॅपिटलने खरेदी केलेल्या अहमदाबाद संघाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यातून ‘बीसीसीआय’ अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) वादात सापडला होता.

Advertisement

आता अहमदाबाद (Ahmedabad) टीमचे व्यवस्थापन महत्वाच्या खेळाडूंना विकत घेण्यासाठी प्रयत्नशील असतानाही त्यांच्यावरील वादाचे मळभ हटलेले नाही.. आगामी आयपीएलमध्येच अहमदाबाद टीमला सहभागी होता येईल की नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे.

नेमके प्रकरण काय..?
सीव्हीसी कॅपिटल (CVC Capital) आणि इरलिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड (Irelia Company Pte Ltd) हे पार्टनर आहेत. सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबाद टीम विकत घेतली असली, तरी इरलिया कंपनी अहमदाबादची टीम चालविणार आहे. मात्र, ‘बीसीसीआय’ने अद्याप त्याला परवानगी दिलेली नाही.

Advertisement

अहमदाबादची टीम खरेदी करणारा ‘सीव्हीसी’ (CVC) ग्रुप सुरुवातीपासून संशयात घेऱ्यात आहे.. बेटींग नि जुगार कंपनीत ‘सीव्हीसी कॅपिटल’ने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचे समोर आलेय. या प्रकाराला भारतीय कायद्यानुसार बंदी आहे. त्यामुळेच अहमदाबाद टीमच्या सहभागाबाबत संशय वाढला आहे..

लिलावापूर्वी झालेल्या पडताळणीत सीव्हीसी ग्रुपचे हे संबंध ‘बीसीसीआय’च्या लक्षात कसे आले नाहीत, याबाबत आता आश्चर्य व्यक्त होत आहे.

Advertisement

2013 मध्ये उघडकीस आलेल्या बेटींग व फिक्सिंग प्रकरणामुळे ‘आयपीएल’ची पूर्वीच खूप बदनामी झालीय. चेन्नई सुपर किंग्स नि राजस्थान रॉयल्सचेचे वरिष्ठ अधिकारी त्यात सापडल्याने या दोन्ही टीमवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7066317507

Advertisement