सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सेंट्रल कोल्फिल्ड्स लिमिटेड (CCL) मध्ये विविध पदांसाठी नोकर भरती सुरु आहे. त्यासाठीची नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
‘अप्रेंटिस अॅक्ट १९६१’ अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे, त्यासाठीची शैक्षणिक अर्हता, पात्रता, वयोमर्यादा, रिक्त पदांची संख्या, अर्ज प्रक्रिया याबाबत जाणून घेऊ या…
एकूण रिक्त जागा- ५३९ पदे
इलेक्ट्रीशियन- १९०
फिटर- १५०
अकाऊंटंट – ३०
मशीनिस्ट- १०
टर्नर- १०
प्लंबर- ७
इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक्स- १०
कारपेंटर- २
बुक बांइंडर- २
फोटोग्राफर- ३
गार्डनर- १०
पेंटर- २
सरदार- १०
फूड प्रोडक्शन- १
शैक्षणिक अर्हता
मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणं अनिवार्य, तसेच संबंधित ट्रेडमध्ये एनसीवीटी / एसीवीटीकडून आयटीआय सर्टिफिकेट आवश्यक आहे..
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षांदरम्यान असावे.. (आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत)
स्टायपेंड
उमेदवारांची निवड मेरिट लिस्टच्या आधारे होणार आहे.. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७ हजार रुपये स्टायपेंड देण्यात येईल.
येथे करा अर्ज – apprenticeshipindia.org
अर्जाची शेवटची तारीख – ५ डिसेंबर २०२१
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7066317507