SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शाळा सुरु होणार का, आरोग्यमंत्र्यांनी काय म्हटलंय.? आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी..!

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने ठाकरे सरकारने 1 डिसेंबरपासून पहिलीपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयानंतर दुसऱ्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्याने जगभर खळबळ उडाली आहे.

या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने सावध भूमिका घेताना, आरोग्य विभागाचा आढावा घेतला. तसेच कोविडबाबत पुन्हा एकदा नव्याने नियमावली जाहीर केली. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत..

Advertisement

कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्याने 1 डिसेंबरपासून सरसकट शाळा सुरु होणार का, असा सवाल विद्यार्थी-पालकांमधून उपस्थित होत होता.. मात्र, राज्य सरकार आपल्या शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले..

दरम्यान, सरकारच्या निर्णयानुसार 1 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार आहेत.. मात्र, त्यासाठी काही नियमांचे पालन विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांनाही करावे लागणार आहे.. याबाबत आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना नुकत्याच जारी केल्या आहेत.

Advertisement

आरोग्य विभागाच्या सूचना

  • दोन विद्यार्थ्यांमध्ये शक्यतो किमान सहा फूट अंतर असावे.
  • शाळेत प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकांना मास्क घालणे बंधनकारक असेल.
  • वारंवार हात धुवावे व शाळेत स्वच्छता राखावी.
  • शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
  • शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरीचा अवलंब करू नये.
  • शाळेतील गर्दीचे उपक्रम, खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात.
  • कोणतीही लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींनाच शाळेच्या आवारात, वर्गात प्रवेश द्यावा.
  • आजारी विद्यार्थी वा शिक्षकांनी शाळेत येऊ नये.
  • क्वॉरंटाईन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध असावी..

जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांना या मार्गदर्शक सूचना पाठविल्या आहेत.

Advertisement

आरोग्य विभागाने केलेल्या या सूचनांचा विचार शिक्षण विभाग करणार आहे. त्यानंतर याबाबत शासन निर्णय जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यातील सर्व शाळांना या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे..

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7066317507

Advertisement