SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘हे’ चित्रपट आणि वेबसीरिज पाहताना क्षणभरही डोळे बंद करू वाटणार नाहीत, वाचा कोणते..?

26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण भारतभर परिणाम पाहायला मिळाला. अनेक पोलीस ऑफिसर, कर्मचारी, लोक शहिद झाले. ‘मुंबईवर झालेला हा दहशतवादी हल्ला’ यावर आधारित अनेक चित्रपट आणि वेब सीरिज निर्मात्यांनी बनवल्या. हे चित्रपट आणि वेब सीरिजला पाहून अनेकांच्या अंगावर आजही शहारे येतात.

मुंबई डायरिज (Mumbai Diaries 26/11) : 26/11 च्या त्या भयानक हल्ल्यात चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांचा बळी गेला. जखमी झालेल्यांना प्रशासन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन जाते. अनेक सुविधांचा तुटवडा अचानक येतो तरी हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स आणि इतर स्टाफने ती परिस्थिती अतिशय हिंमतीने हाताळली या सर्व गोष्टी या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. यात मोहित रैना, कोंकणा सेन शर्मा आणि मृण्मयी देशपांडे यांनी प्रमुख भूमिका साकारली.

Advertisement

हॉटेल मुंबई (Hotel Mumbai) : ताज हॉटेलमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे अनेक बड्या उद्योगपतींपासून तर वेटरपर्यंत बऱ्याच जणांचा जीव मुठीत सापडला होता. काहींना जीवही गमवावा लागला. विदेशी पर्यटकही ताज हॉटेलमध्ये होते. ताज हॉटेलमध्ये झालेला हल्ला आणि हे सर्व हॉटेल मुंबई या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले. ताज हॉटेलच्या स्टाफने तसेच शेफ आणि इतर कर्मचाऱ्यांनी लोकांची कशी सुटका केली हे या चित्रपटात दाखवलं आहे. या चित्रपटात अनुपम खेर, देव पटेल आणि आर्मी हेमर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

वन लेस गॉड (One Less God) : वन लेस गॉड हा परदेशी पर्यटकांवर आधारित चित्रपट आहे, हे परदेशी पाहुणे दहशतवाद्यांच्या ताब्यात असताना त्याभोवती या चित्रपटाची कथा फिरते. सुखराज दीपक, जोसेफ मल्हार, माहिका राव आणि कबीर सिंह यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.

Advertisement

द अटॅक ऑफ 26/11 (The Attacks of 26/11) : महाराष्ट्राची राजधानी मुंबईमधील हल्ल्यात पकडलेला दहशतवादी अजमल कसाबची पोलीस अधिकाऱ्यांनी केलेली चौकशी आणि कथा सोबत घडताना दाखवली आहे. 1 मार्च 2013 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

फॅन्टम (Phantom) : मुंबई हल्ल्यावर आधारित पुस्तक ‘मुंबई एवेंजर्स’ च्या कथानकावर ‘फॅन्टम’ या चित्रपटाची निर्मीती करण्यात आली, या चित्रपटात सैफ अली खानची मुख्य भूमिका असून मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हणून ओळखला जाणाऱ्या हाफिज सईदची गोष्ट दाखवण्यात आली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7066317507

Advertisement