SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता ‘व्हाॅट्स अ‍ॅप’वरील ‘व्हाईस काॅल’ रेकाॅर्ड करता येणार, या सोप्या ट्रिक्स वापरा..!

सोशल मीडियात सर्वात वापरले जाणारे अ‍ॅप म्हणजे ‘व्हाॅट्स अ‍ॅप’.. या ‘अ‍ॅप’द्वारे जवळच्या माणसांना मेसेज, फोटो, व्हिडीओ पाठवता येतात.. मिळवता येतात.. तसेच व्हाईस काॅल किंवा व्हिडीओ काॅलही करता येतो..

‘व्हाॅट्स अ‍ॅप’ने 2015 मध्ये आपल्या युजर्ससाठी व्हॉईस कॉलिंग फीचर लॉंच केले होते. व्हॉईस कॉलिंग फीचरचा यूजर्सना मोठा फायदा झाला.. मात्र, आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवर ‘व्हॉईस कॉल’ रेकॉर्डची सोय कंपनीने करुन दिलेली नाही.

Advertisement

मात्र, ‘व्हाॅट्स अ‍ॅप’द्वारे केला जाणार व्हाईस काॅलही रेकाॅर्ड करता येतो.. त्यासाठी एक खास ट्रिक आहे. त्या माध्यमातून तुम्ही हा काॅल सहज रेकॉर्ड करू शकता. चला तर मग याबाबत जाणून घेऊ या…

व्हाईस काॅल कसा रेकाॅर्ड करणार..?

Advertisement
  • ‘व्हाॅट्स अ‍ॅप’चा व्हाईस काॅल रेकॉर्ड करण्यासाठी, सुरुवातीला गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) वर जाऊन तेथे ‘क्यूब कॉल रेकॉर्डर’ अ‍ॅप डाउनलोड करा.
  • आता डाउनलोड केलेले अ‍ॅप उघडा नि व्हॉट्स अ‍ॅपवर जा. समोरच्या व्यक्तीला व्हाॅटस अ‍ॅपवरुन व्हाईस काॅल करा..
  • तुम्ही कॉल करताच, हे ‘क्यूब कॉल रेकॉर्डर’ अ‍ॅपद्वारे बॅकग्राउंडमध्ये तुमचा कॉल रेकॉर्ड होण्यास सुरुवात होईल.
  • तुम्ही कॉल कट केल्यावर रेकॉर्डिंगही आपोआप बंद हाेईल.
  • तुम्हाला अ‍ॅपच्या नोटिफिकेशन पॅनेलमध्ये रेकॉर्ड केलेला कॉल पुन्हा ऐकता येईल.

‘कस्टम स्टिकर’ फीचर
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच व्हाॅट्स अ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी ‘कस्टम स्टिकर’ हे फीचर आणले होते.. त्याद्वारे यूजर्स त्यांच्या फोटोचेही स्टिकर बनवू शकता. इतर युजर्ससोबत ते शेअर करू शकता. मात्र, सध्या हे फिचर अ‍ॅन्ड्राईड (Android) व आयओएस (iOS) युजर्ससाठी उपलब्ध नाही.

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7066317507

Advertisement