SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फेसबूकवर होणाऱ्या टाईमपासला आळा..! हे फीचर युजर्सना करणार जागे..

सोशल मीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅप म्हणजे फेसबूक.. जगभरात या सोशल मीडियाचे युजर्स आहेत. तास न् तास अनेक युजर्स फेसबुकवर असतात.. मात्र, ही वेळ कशी गेली, हेही त्यांच्या लक्षात येत नाही, मग त्याची अनेकांना खंतही वाटते.

..पण थांबा..! आता फेसबुकवर होणारा हा टाईमपास थांबवता येणार आहे.. त्यासाठी खुद्द फेसबूकच युजर्सच्या मदतीला आहे. त्यासाठी खास फीचर उपलब्ध करुन दिले आहे. या फीचरचे नाव आहे, ‘क्विट मोड’ (Quiet Mode).. या फीचरद्वारे युजर्सचा अमूल्य वेळ वाचणार असल्याचा दावा केला जातो.

Advertisement

फीचरचा वापर असा करा..

  1. फेसबुक अकाउंट ओपन केल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.
  2. खाली सेटिंग्ज अॅण्ड प्रायव्हसी (Setting and Privacy) पर्यायावर क्लिक करा.
  3. नंतर नवे पेज ओपन होईल. तेथे समोर आलेल्या पर्यायांमधून ‘Your Time on Facebook’ च्या ऑप्शनवर क्लिक करा.
  4. त्यानंतर मॅनेज युअर टाईम (Manage Your Time)वर क्लिक करून Quiet Mode वर क्लिक केले की हे फीचर ऑन होईल.

डिस्टर्ब होणार नाही
फेसबुकच्या सेटिंगमध्ये हे फीचर ऑन केल्यानंतर सर्व नोटिफिकेशन्स बंद होतील. त्यामुळे युजर्सना काम करताना डिस्टर्ब होणार नाही. दररोज काही वेळासाठी फेसबुक  वापरणाऱ्यांनाही या फीचरचा फायदा होतो..

Advertisement

या फीचरवर टाईमही सेट करता येतो. एकदा सेट केलेला टाईम संपल्यानंतर फेसबुकमार्फत युजरला मेसेज येईल. युजरने फेसबुकवर काय काय केलं, कोणत्या गोष्टींसाठी किती वेळ दिला, याचीही माहिती या फीचरद्वारे समजणार आहे..

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7066317507

Advertisement