दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर जगभरात घबराट पसरली आहे.. ‘ओमिक्रॉन’ असे या नव्या विषाणूचे नाव आहे.. विशेष म्हणजे, कोणतीही कोरोना लस त्यावर परिणामकारक नसल्याने चिंतेत भर पडली आहे..
या पार्श्वभूमीवर अनेक आफ्रिकन देशांमधून प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. आगामी काळात आफ्रिकेत अनेक स्पर्धा होणार होत्या. मात्र, आता त्या थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘ओमिक्रॉन’ विषाणू आढळल्याने ‘आयसीसी’ने महिलांची वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. झिम्बाब्वेमध्ये सुरु असलेले क्वालिफायरचे सामने तात्काळ थांबविण्यात आले आहेत. नेदरलँड्सनेही अर्ध्यातच दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द केला आहे.
सध्या टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाचा हा दौरा 17 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यात टीम इंडिया 3 कसोटी, 3 वनडे आणि 4 टी-20 सामने खेळणार आहे….
केंद्राची ‘बीसीसीआय’ला सूचना
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे भारताचा हा दक्षिण आफ्रिका दौराही संकटात सापडला आहे. दक्षिण आफ्रिकेत भारताचा संघ पाठविण्यापूर्वी भारत सरकारशी संपर्क साधण्याची सूचना केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘बीसीसीआय’ला केली आहे..
‘केवळ ‘बीसीसीआय’च नव्हे, तर प्रत्येक मंडळाने दक्षिण आफ्रिकेत संघ पाठवण्यापूर्वी भारत सरकारचा सल्ला घ्यावा, कारण तेथील कोविड-19 चा नवीन प्रकार भारतात येण्याचा धोका असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
दरम्यान, भारतीय संघाचा आफ्रिका दौरा झाला, तर खेळाडूंना मुंबईहून जोहान्सबर्गला चार्टर विमानाने पाठवलं जाईल.. बदललेल्या परिस्थितीमुळे खेळाडूंना 3 ते 4 दिवस क्वारंटाईन व्हायला लागेल, अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याने दिली.
📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7066317507