SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कोरोनामुळे महाराष्ट्रात पुन्हा नवे निर्बंध, ठाकरे सरकारकडून नियमावली जाहीर..

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंट आढळून आल्याने अवघे जग पुन्हा एकदा धास्तावले आहे.. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) धोक्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी परत लाॅकडाऊन करण्यात आले आहे..

सध्या भारतासह राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण बरेच कमी झालेय.. त्यामुळे सरकारने बऱ्यापैकी शिथीलता दिली होती. त्यातून जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच, ही बातमी आली.. त्यामुळे कोणतीही रिस्क न घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने आढावा बैठक घेऊन सूचना केल्या..

Advertisement

नव्या व्हेरिएंटमुळे ठाकरे सरकारही सावध झालेय.. यापूर्वी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांमध्ये शिथिलता दिली होती, मात्र राज्य सरकारने आज (ता. 27) पुन्हा एकदा नवी नियमावली जारी करण्याचा आदेश दिला.

अशी असेल नवी नियमावली…
– संपूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांनाच यापुढे सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार. मुंबईतील लोकलप्रमाणे एसटी, बससेवा, टॅक्सी, रिक्षाने प्रवास करण्यासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगी देण्यात आलीय.

Advertisement

– कोरोनाचे नियम न पाळणार्‍यांविरुद्ध दंडाची रक्कम वाढविण्यात येणार. रिक्षा, टॅक्सीतील प्रवाशी विनामास्क आढळ्यास 500 रुपये, तर रिक्षा-टॅक्सी चालकालाही 500 रुपये दंड आकारला जाणार..

– दुकानात ग्राहकाने मास्क घातलेला नसल्यास ग्राहकाला 500 रुपये, तर दुकानदाराला 10 हजार रुपये दंड केला जाणार..

Advertisement

– मॉल्समध्ये विनामास्क ग्राहक आढळल्यास मॉल्स मालकाला 50 हजार रुपये दंड आकारणार.

– राजकीय सभा, जाहीर कार्यक्रमांना परवानगी असेल, मात्र नियम न पाळल्यास आयोजकांवर 50 हजार दंड, तसेच कार्यक्रम बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला दिला आहे.

Advertisement

– भारत-न्यूझीलंडमध्ये वानखेडे स्टेडियममध्ये 3 ते 7 डिसेंबरदरम्यान होणार्‍या टेस्टसाठी 25 टक्के प्रेक्षकांनाच परवानगी देणार..

शाळांचे काय होणार..?
राज्यातील शाळा 1 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. नवा विषाणू सापडला असला, तरी शाळा सुरू करायला आमची काहीही हरकत नाही. मात्र, याबाबत उद्या (ता. 28) होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले…

Advertisement

आफ्रिकेची विमानसेवा बंद करावी
दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांसाठी 72 तासांची ‘आरटीपीसीआर टेस्ट’ अनिवार्य केली आहे. आफ्रिकेतून येणारी विमाने पूर्णतः बंद करायला पाहिजेत, अशी मागणी टोपे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे..

📣 आता महत्वपूर्ण News अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी पुढील क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 7066317507

Advertisement